Search for:

उत्सव रंग पंचमीचा आणि होळीचा

रंग पंचमी आणि होळी या दोन्ही सणांना रंग खेळण्याची प्रथा आहे. वस्तुतः होळी हि होलिका दहनाच्या दुसर्या दिवशी साजरी केली जाते. पूर्वी लोक होळीला होलिका दहनाच्या उरलेल्या राखे सोबत खेळत असत परंतु आता होळी रंगांसोबत खेळली जाते. महाराष्ट्रात आणि उत्तर भारतातील काही ठिकाणांमध्ये रंग पंचमी होलिका दहनानंतर च्या पाचव्या दिवशी साजरी करतात. रूढी प्रमाणे रंग पंचमी गुलाल खेळून साजरी करत असे परंतु आता गुलालाची जागा रंगांनी घेतली आहे.


असे मानतात कि जेव्हा होळी ची आग पेटवली जाते तेव्हा सगळे नकारात्मक गुण, तामसिक आणि राजसिक गुण नष्ट होतात. हे नकारात्मक गुण जीवनाच्या चक्रातून मुक्ती मिळवण्यामध्ये आणि मोक्ष प्राप्त करण्यामध्ये अडथळे आणतात. जेव्हा हे गुण आगीत नष्ट होतात तेव्हा आपल्याला सात्विक गुणांनी युक्त अशी राख मिळते जी निसर्गतः सकारात्मक असते. हे सात्विक गुण आपल्याला मोक्ष प्राप्त करण्यात मदत करतात. त्यामुळेच होलिका दहनाच्या दुसर्या दिवशी राख खेळून होळी साजरी करतात. होळी ला अनेक नावं आहेत जसे धुलेंडी, धुर्डी, धुलवड, धूलिवंदन, ई.


अमावास्यंत पंचांगानुसार रंग पंचमी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पंचमी तिथी ला आणि पुर्निमंत पंचांगानुसार चित्र महिन्यातील कृष्ण पंचमी तिथी ला असते. काही ठिकाणी होळी पाच दिवस साजरी केली जाते. होळी ला उत्तर भारतात होरी, दोल जात्रा, महाराष्ट्रात होळी, दक्षिण भारतात काम दहन आणि पश्चिम बंगाल मध्ये दोल जात्रा या नावांनी जाणले जाते.
रंग पंचमी द्वारा पंच तत्त्वांना (अग्नि, पृथ्वी, वायु, जल आणि आकाश) जागृत केले जाते. हे पाच तत्त्व जीव च्या अध्यात्मिक भावानुसार देवत्व ला गुलाल आणि रंगीत पाण्याद्वारे जागृत केले जाते. हा सुण फक्त ऋतू बदल नाही तर नाच, गाणं आणि आनंदाचे संमेलन दर्शवतो.


प्रत्येक जागेनुसार होळीला वेगळे नावं आणि वेगळी परंपरा आहे परंतु सर्व ठिकाणी हा सण रंगांशी निगडीत आहे. याचमुळे कुठल्याही प्रांतात असो व या सणाला कुठल्याही नावाने जाणत असो, तुम्ही हा सण मोठ्या उत्साहाने आणि प्रसन्नतेने साजरा करा.


या वर्षीचा होळी, होलिका दहन आणि रंग पंचमीचा मुहूर्त:


• होलिका दहन – १७ मार्च २०२२, गुरुवार. पौर्णिमेचा प्रारम्भ ०१:३० वाजता.
• होली/धूलिवंदन – १८ मार्च २०२२, शुक्रवार. पौर्णिमा १२:४८ वाजता समाप्त होते त्यामुळे चा प्रारंभ या नंतर होईल.
• रंग पंचमी – २२ मार्च २०२२, मंगलवार. पंचमी तिथिचा प्रारम्भ ०६:२५ वाजता.

[INSERT_ELEMENTOR id="1382"]