
गणपती बाप्पासाठी दुर्वांचे महत्व
दुर्वा हा शब्द दुहु व अवाम्ह्यातून तयार झाला आहे. ह्याच्या उचारणाने अध्यात्मिक भाव उत्पन्न होतात व देवाच्या भक्तीत विलीन होण्यास मदत करतात.
पौराणिक कथना प्रमाणे, एकदा अनलासूर नावाच्या राक्षस सर्वत्र विनाश करत सुटला होता. तो स्वतःच्या डोळ्यातून आग ओकुन सर्व काही भस्म करून टाकायचा. त्याचा नाश करणे कुणालाही शक्य झाल नाही तेंव्हा सर्व देवांनी मिळून गणेशाला साकडं घातल कि ह्या दैत्यपासून सर्वांचे रक्षण करा.
तेंव्हा गणरायाने विराट रूप धारण केले व अनलासूर राक्षसाला गिळून टाकले व सृष्टीची रक्षा केली. परंतु ह्या राक्षसाला गिळल्या मुळे गणेशाच्या पोटात खूप आग होऊ लागली. सर्वांच्या अथक प्रयत्न नंतरही त्याच्या पोटातील आग शांत होईना.
तेंव्हा काही ऋषी मुनी आले व गणपतीला २१ दुर्वांची जुडी वाहिली. त्या दुर्वा खाताच गणेशाच्या पोटातील आग शमली व त्यास बरे वाटू लागले. तेंव्हा पासून दुर्वा हे गणरायाच्या आवडीच्या खाद्य पदार्थां मधले सर्वात ष्रेष्ठ बनले. त्या नंतर गणपतीला 21 किंवा 11 दुर्वांची जुडी अर्पण करणे हा विधीचा एक भाग बनला. दुर्वां द्वारे ईश्वरी तत्त्वाचे प्रकाशन झाल्या मुळे वातावरणातील रज-तमोगुणांचा परिणाम कमी होतात.
3 किंवा 5 पातीअसलेल्या गवताला दुर्वांकुर म्हणतात. दुर्वा म्हणून वापरल्या जाणाऱ्या गवताचे पाते हे नेहमी पातळ असते. रुंद आणि जाड पात्या चे गवत दुर्वा म्हणून वापरले जात नाही. पातळ पतीच्या ह्या दुर्वा पाण्यात बुडवून गणपतीला 21 किंवा 11 किंवा 51 च्या जुडी मध्ये अर्पण करावे. जुडी अर्पण करताना नेहमी दुर्वांच्या तळाशी बांधलेला धागा किंवा रबरबँड काढून टाकावा आणि मगच देवाला वाहाव्यात.
॥गणपती बाप्पा मोरया॥
गणपतीला दुर्वा अर्पण करताना खालील 10 मंत्रांचा जप करावा.
ॐगणाधिपायनमः ॐउमापुत्रायनमः
ॐविघ्ननाशनाय्नमः ॐविनायकायनमः
ॐईशपुत्रायनमः ॐसर्वसिध्दिप्रदायनमः
ॐएकदंतायनमः ॐइभवक्त्रायनमः
ॐमुशाकवाहनायनमः ॐकुमारगुरवेनमः
[INSERT_ELEMENTOR id="1382"]
Copyright © 2025 Vedik Astrologer | Powered by MI Tech Solutions