पूर्ण कलश
सत्यनारायणाची पूजा असो, गृह प्रवेश, लग्न, ऑफिसचे उद्घाटन, अन्य कुठलाही समारंभ असो, या सर्व समारंभांमध्ये एक गोष्ट नेहमी महत्वाची असते ती म्हणजे पूर्ण कलश.
ऋग्वेदा मध्येही पूर्ण कलशाचा उल्लेख अढळतो. त्याला सोम कलश, चंद्र कलश, इंद्र कुंभ, पूर्ण घट, पूर्ण विराकमस्य, भद्रा घट आणि मंगल घट अश्या नावांनी हि संबोधले जाते. पूर्ण कलशाचा अर्थ ‘काठोकाठ भरून वाहत आहे’ असा हि होतो.
पूर्ण कलश हे हिंदू धर्माच्या धार्मिक कार्याचा केंद्र भाग आहे. पूर्ण कलश म्हणजे तांब्याचा / पितळ्याचा / चांदीचे भांडे जे खाली निमुळते होत जाते आणि मध्यभागी फुगीर, मग पुन्हा निमुळते होते आणि सर्वात वरती मोठे तोंड असते (तांब्याचा आकार). हा कलश संपूर्ण पाण्याने भरून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढले जाते, आंब्याची पानं थोडीशी पाण्यात बुडतील अशी वर्तुळाकार ठेऊन त्यावर एक नारळ ठेवला जातो.
पूर्ण कलश हे विपुलता, समाधान आणि अमरत्वचे प्रतीक आहे. असे हि म्हणतात कि हे भगवान विष्णूचे दैवी रूप दर्शवते. पूर्ण कलशाला पौराणिक समुद्र मंथनातून उद्भवलेल्या अमृत कलशच्या समतुल्य मानले जाते.
धातू पासून बनलेला कलश हा पृथ्वी प्रमाणे प्रजनन क्षमता दर्शवते. गर्भा प्रमाणें जीवनाचे पालनपोषण करते. कलशातील पाणी निसर्गाची जीवन देणारी क्षमता दर्शवते. आंब्याची पाने काम भाव दर्शवते, प्रजनन क्षमतेच्या आनंदाच्या पैलूचे प्रतीक आहेत. नारळ, समृद्धी आणि शक्ती दर्शवते.
पूर्ण कलश हे पाच घटक किंवा सप्तचक्रांशी देखील संबंधित आहे. कलश पात्राचा तळ पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करतो. पात्राचा मधला विस्तारित केंद्र जल (आप) तत्वाचा आहे, पात्राची मान अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करते, सर्वात वरचा भाग म्हणजे पात्राचे तोंड हे वायू तत्वाचे प्रतीक आहे आणि आंब्याची पाने व नारळ हे आकाश तत्वाचे मानले जातात. नारळाचा वरचा भाग (शिर) सहस्त्रार चक्राचे प्रतीक मानले जाते आणि कलश हे मूळ समजले जाते म्हणून हे मूलाधार चक्र दर्शवतो.
आशा आहे कि हि माहिती आपल्याला उपयोगी वाटली असेल आणि पुढच्या घरकार्यात तुम्हाला कलशाचा अर्थ आणि महत्व आठवेल.
Contact
Home Address
Phone No. : 91+ 749 9846 591
Email: mrunal@vedikastrologer.com
Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044
Office Address
Address: Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.
Map
Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.
Copyright © 2026 Vedik Astrologer | Powered by MI Tech Solutions






