Search for:

जानव्याचे महत्व

हिंदू धर्माचे प्रतिक मानलं जाणारे जानवे कायम स्वरुपी घालावे. हा धाग्यांचा समूह मंत्राने सिध्द केलेले यज्ञोपवित असते.
कुणी व कोणत्या वयात व किती धागे घालावेत हे १६ संस्कारात सांगितलेले आहे.

आपण जानव्यातील धाग्यांना पदर, दोरा, सूत अशी वेगवेगळी नावे वापरतो पण खरं तर त्याला तंतू हा मूळचा व योग्य शब्द
आहे. जानवे हे ३ तंतूंच्या समूहाने बनते, त्याला यज्ञोपवीताचे त्रिसूत्रीकरण म्हणतात. प्रेत्येक पदरास एक गाठ असते त्यास ग्रंथी
म्हणतात. अश्या ३ ग्रंथींची मिळून एक गाठ मारली जाते त्याला ब्रह्मगाठ (किंवा अद्वैताची गाठ) म्हणतात.

साधारणतः खांद्यापासून बेंबी पर्यंत आणि परत मागून खांद्या पर्यंतचे माप हे ३२ अंगुली मानले जाते. त्यामुळे ३ तंतूंचे एक
जानवे हे ३२ अंगुली एवढे लांब असते. जानव्याची लांबी हि बेंबी पर्यंतच असावी. (एक अंगुली म्हणजे हाताच्या मधल्या बोटा
एवढे)

जानवे कसे, कधी व किती धाग्यांचे घालतात?

जानवे हे गायत्री मंत्राचा जप करून कायम डाव्या खांद्या वरून उजव्या (हाता खाली) कमरे कडे घालावे. जानवे कायम स्वरूपी
घालावे. खराब झाल्यास विधिवत संस्कार करुन नवीन जानवे घालावे.

पहिले जानवे हे वयाच्या ८ व्या वर्षी मुंजीचे संस्कार करून घातले जाते. ह्या वेळेस फक्त ३ तंतूंची एक ब्रह्म गाठ असलेले जानवे
मुलाच्या खांद्यावर घातले जाते. हे त्या मुलाच्या त्या वयातील ३२ अंगुली एवढे असते.

सोडमुंजीचा विधी करताना अजून एक ३ तंतूंची एक ब्रह्म गाठ असलेले जानवे वाढवले जाते. म्हणजेच सोडमुंजी नंतर (लग्न
अधी) मुलाच्या खांद्यावर २ ब्रह्म गाठीचे ६ तंतूंचे जानवे असते. हे जानवे त्याच्या ह्या वयातील ६४ अंगुली एवढे असते.

लग्ना मध्ये अजून एक ३ तंतूंची ब्रह्म गाठ वाढवली जाते. त्यामुळे लग्न झालेल्या व्यक्तीच्या खांद्यावर एकूण ९ तंतूंच्या ३ ब्रह्म
गाठी असतात. हे जानवे प्रौढ व्यक्तीच्या एकूण ९६ अंगुली एवढे असते.

५ कर्मेंद्रिय + ५ पंच प्राण + ५ तन्मात्रा + ५ पंच भूत + ६ भाव विकार + ६ अरिशदवर्ग + ६ शदुर्मी + ६ धातू + ४ अंतःकरण + ३
अवस्था + ३ देह + ३ जीव + ३ कर्म + ५ कर्मेंद्रिय क्रिया + ४ मनःक्रिया + ४ मानस अवस्था स्थिती + १४ देवता + ८ आत्मगुन +
१ परब्रह्म मिळून एकूण ९६ होतात म्हणून जानवे ९६ अंगुली माप घेतात.

जानवं कोण घालू शकत?

वेदांमधे सांगितले आहे कि जानवं हे सर्व वर्णातील लोकांनी घालावे. फक्त जानव्याची लांबी किती अंगुली असावी हे वर्णानुसार
ठरते.

  • ब्राह्मणाचे जानवे ९६ अंगुली असावे
  • क्षत्रियाचे जानवे ९२ अंगुली असावे
  • वैश्याचे जानवे ९० अंगुली असावे

असे मानले जाते कि जानव्याच्या ३ गाठी सात्विक, राजसिक आणि तामसिक ह्या त्रिगुणांनी नियंत्रित असतात जे आत्म्याची,
विचारांची आणि शरीराची शुद्धता दर्शवतात.

ज्ञानोबा माऊलीनीं जानव्याला ज्ञानेश्वरीत नवरत्नाच्या हाराची उपमा दिली आहे…

तो गुण नवरत्नाकारू
यया नवरत्नाचा हारू
न फेङितले दिनकरू
प्रकाश जैसा

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn