Search for:
33 koti dev

तेहतीस कोटि देव कोणते?

खूप लोकांना आपण नेहमी बोलताना ऐकतो तेहतीस कोटि देवांना साकडं घातलं – तेहतीस कोटि देवांच्या साक्षीने -तेहतीस कोटि देव अवतरले तरी शक्य नाही – इत्यादी, इत्यादी … आपल्याला खरंच वाटतं कि ‘तेहतीस कोटि’ चा अर्थ ‘तेहतीस करोड’ असेल. बापरे येवढे देव आहेत आपले…!


आणि ह्यामुळे आधुनिक काळातील तरुण पिढीचा आणि पाश्चात्यांसाठी हा एक मोठा चेष्टेचा विषय झालाय. नाही ओ नाही, नीट वाचा परत. येथे कोटि शब्दाची वेलांटी, ‘टि’ पहिली आहे. तेहतीस आकडा बरोबर आहे पण कोटि शब्दाचा अर्थ वेगळा आहे. हा शब्द संस्कृत मधून आलाय, ‘कोटि’ या शब्दाचा अर्थ कोटी किंवा करोड नसून ‘प्रकार’ असा आहे. जेंव्हा देवाने विश्व् निर्मिती केली तेंव्हा ह्या निसर्गाचे, सृष्टीचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी ३३ प्रकारच्या देवांची निर्मिती केली आणि त्यांच्यावर सृष्टीचा कार्यभार सोपवला.


त्यांच्यात ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र आणि १ प्रजापती असे पाच स्तर आहेत. प्रत्येकाचा कार्यभाग (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटि (कॅटेगरी) दिलेली आहे.

 

अष्टवसू: वसु नावाचा अर्थ ‘तेजस्वी’ किंवा ‘संपत्ती देणारा’ असा होतो. 

 

अष्टवसु हे निसर्गाच्या पैलूंचे प्रतिनिधित्व करणारे आठ मूलभूत देव आहेत. ह्यांचा उल्लेख रामायणात कश्यप आणि अदितीची मुले म्हणून आणि महाभारतात मनू किंवा ब्रह्मा प्रजापतीची मुले म्हणून आढळतो. पुराणातील वेग वेगळ्या ग्रंथांमध्ये त्यांची नावांमध्ये भिन्नता आढळते, तरी प्रचलित असलेली नावे पुढील प्रमाणे.


आप (पाणी), धृव (स्थिर), सोम (चंद्र), धर (पृथ्वी), अनिल (वारा), अनल (अग्नी), प्रत्यूष (सूर्य) आणि प्रभास (आकाश).


११ रूद्र: विष्णू पुराणा नुसार रुद्र हे शिवाचे अवतार दर्शवतात. शिव जेंव्हा अर्धनारी रूपात होते तेंव्हाच्या त्यांच्या त्या उग्र रुपाला रुद्र नाव दिले आहे. त्यातील पुरुष रूपाचे ११ अवतारात विभाजन झाले आणि त्यांच्यापैकी काही पांढरे आणि सौम्य होते तर काही गडद आणि भयंकर होते. त्यांची नावे पुढील प्रमाणे.


मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.


जो अर्धा भाग स्त्रीचा होता त्याचे हि ११ अवतारात विभाजन झाले आणि त्यापासून रुद्राणी तयार झाल्या. धी, वृत्ती, उसाना, उरणा, नियुता, सरपीस, इला, अंबिका, ईरावती, सुधा आणि दिक्षा. (पण त्यांच्या समावेश ह्या ३३ कोटि देवतां मध्ये केलेला नाही) पुन्हा ह्या ११ रुद्राची नावे आणि त्यांच्या जनकांची नावे प्रत्येक ग्रंथात / पुराणात वेगवेगळी दिली गेली आहेत पण सगळीकडे ती ११ च आहेत.


१२ आदित्य: १२ आदित्यांचा उल्लेख ऋग्वेदात ६-८ च्या संख्येने आढळतो, ब्राह्मणांमध्ये ही संख्या 12 पर्यंत वाढते. महाभारत आणि पुराणात कश्यप ऋषींचा पिता म्हणून उल्लेख आहे. वर्षाच्या प्रत्येक महिन्यात वेगळा आदित्य चमकतो असे मानले जाते. १२ आदित्यची नावे पुढील प्रमाणे.


अंशुमन, आर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू (वामन अवतारात)
१ इंद्र: इंद्र हा स्वर्गाचा आणि सर्व देवांचा राजा आहे. तो आकाश, वीज, हवामान, मेघ-गर्जना, वादळ, पाऊस, नदीचे प्रवाह आणि युद्ध यांचा कारक आहे. बऱ्याच ग्रंथ / पुराणांमध्ये इंद्राला ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य ह्या सगळ्यांनाचे नेतृत्व दिल्याचे दिसते.


१ प्रजापती: निर्मितीचा आणि संरचनेचा अधिपती म्हणजेच प्रजापती. सृष्टीची रचना आणि निर्मितीचा भार प्रजापतीवर होता. प्रजापतीला विषवकर्मा, दक्ष अश्या अनेक नावांनी ओळखले जाते. हा ब्रह्माचा मानसपुत्र आहे. ऋग्वेदात प्रजापतीला आदित्यांमधील एक मानला आहे, आणि त्याला पौरात्याच प्रतीक समजले जाते.


हे सगळे मिळून एकंदर ८ + ११ + १२ + १ + १ = ३३ प्रकारचे म्हणजेच ३३ कोटि देव होतात.

 

आता कोणी परत ३३ कोटी देव म्हणलं तर त्यांना हे सगळं समजावून सांगा आणि आपल्या देव-देवतांचा, संस्कृतीचा मान
राखा

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn