Search for:

मांगळीक

आत्ता पर्यंत तरी माझ्याकडे लग्नाचे प्रश्न घेऊन येणाऱ्यांची संख्या जास्त. त्यात ज्यांच्या पत्रिकेत मंगळ असेल ती माणसं, विशेष करून त्यांचे आई – वडील, हे इतके संभ्रमित असतात आणि १० ठिकाणी पत्रिका दाखवून तिथून इतक्या वेगवेगळ्या कल्पना डोक्यात बाळगून असतात आणि मनाचे समाधान मिळत नाही किंवा पटेल असे उत्तर मिळत नाही म्हणून परत ११ व्या जोतिषाच्या शोधात असतात.


पत्रिकेत मंगळ आहे म्हणजे काय?
पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जन्म कुंडलीत सगळ्या १२ राशी आणि ९ ग्रह हे असतातच. कुंडलीतील ठराविक भावांमध्ये जेव्हां मंगळ ग्रह बसलेला असतो तेंव्हा त्याला मंगळाची पत्रिका किंवा मांगळीक म्हणतात.

 

कुंडली मध्ये १२ घरं/भाग असतात ज्याला जोतिष भाषेत भाव म्हणतात. त्यातील १ल्या, ४थ्या, ७व्या, ८व्या, किंवा १२व्या भावात (सोबतच्या चित्रात दाखवलाय तिथे) मंगळ ग्रह असेल तर ती व्यक्ती मांगळीक आहे असे समजतात. जेंव्हा ह्या ठराविक भवन मध्ये मंगळ ग्रह येतो तेंव्हा त्या व्यक्ती वरती मंगळाचा विशेष प्रभाव असतो.


मुळात आपल्याला आधी मंगळ म्हणजे काय हे जाणून घेणे गरजेचे आहे. मंगळ हा ग्रह मंडळाचा सेनापती आहे. सगळ्यांच्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर आहे. आता हो सेनापती आहे तो शूरवीर, ताकदवान तर असणारच न. अशी माणसं शक्तिशाली असतात, एकनिष्ठ असतात, सतत डोक्यात कसले ना कसले प्लॅनिंग चालू असतात, पटकन चिडतात, सगळ्यांवरती त्यांचा दरारा असतो आणि सगळे त्यांना घाबरतातही, शिस्त प्रिय असतात. काही वेळेस त्यांना कर्तव्य पालनासाठी क्रूर सुद्धा व्हावे लागते आणि त्यात तो अग्नी तत्वाचा ग्रह आहे त्यामुळे अजून हट्टी आणि चिडके पणा आलाच. अगदी समजेल असे उदाहरण द्यायचे म्हणजे बाहुबली मधील कट्टप्पा डोळ्यासमोर आणा.
आता कळला का मंगळाचा स्वभाव?


अशा हा मंगळ जेव्हां कुंडलीत पहिल्या घरात येतो ते तेव्हां त्या व्यक्तीला (ज्याची हि पत्रिका आहे) ह्यातील बहुतांश स्वभाव गुण घेतो (अगदी तंतोतंत सगळे हेच गुण असतीलच असे नाही, त्यातही अनेक नियम लागू होतात). ४ था भाव मनाचा कारक भाव आहे, तिथे आला तर त्याव्यक्तीच्या मनावरती ह्या ग्रहाचा प्रभाव असतो. हे आणि अशी अनेक करणे आहेत, प्रत्येक भावात आल्यावर त्या व्यक्तीला मंगळाचा वेगळ्या ठिकाणी प्रभाव दिसून येतो.


पत्रिकेला मंगळ आहे म्हणजे ती व्यक्ती लगेच वाईट वृत्तीची किंवा काहीतरी महा भयंकर आजार झालेली व्यक्ती असल्या सारखे बघण्याची गरज नाही. त्यांचा स्वभाव, वर्तन हे इतरां पेक्षा थोडे कडक असते एवढाच. बऱ्याच ठिकाणी ह्याला मंगळ दोष असेही टायटल दिले जाते जे मला चुकीचे वाटते. मंगळ हा एकटा वाईट करण्याचे चान्सेस खूप कमी असतात. पत्रिकेत जर अजून कोणी ग्रह असा उच्छाद मांडणार असेल तर म्हणू शकतो कि ह्या व्यक्तीच्या नशिबी काही दोष लागलाय. कारण एका पत्रिकेसाठी एखादा ग्रह चांगला कि वाईट हे ठरवण्यासाठी अनेक मापदंड (पॅरामीटर्स) वापरले जातात. मग नुसता एकाच घटक पाहून लगेच त्याला दोष आहे असा सांगणं चुकीचे नाही का?


त्यामुळे ज्याला ह्या विद्येची कल्पना नाही, त्यातले काही काही काळात नाही अशी हि सामान्य व्यक्ती घाबरून जाते, गडबडून जाते.
हल्ली तर पैश्याच्या मोहा पोटी अनेकांना पत्रिकेत नसलेल्या योगसाठी शांती, होम, पूजा रत्ने सांगितली जाताना पाहते जेव्हां खूप वाईट वाटे. ह्यामुळे सामान्य माणसाचा जोतिष शास्त्रावरील विश्वास उडू लागलाय हे त्या लोकांना कळतच नाही.


जर पत्रिकेला मंगळ असेल तर काय करायचे? असा प्रश्न सगळे विचारतात. त्यासाठी मंगळाची अवस्था त्याचे डिग्रीज त्याचे स्थान सगळे पाहावे लागते. त्या नुसार त्याला योग्य जोडीदार निवडावा लागतो. अश्या व्यक्तीला योग्य जोडीदार म्हणजे शनीची पत्रिका. चित्रात दाखवल्या प्रमाणे जेथे मंगळ आहे तिथेच शनी आला कि झाली शनीची पत्रिका. शनीचीच का बरं बघायची पत्रिका?


कारण मंगळ जर ऊर्जा आहे तर शनी हा स्पंज आहे. मंगळाची ऊर्जा / त्याची ताकद झेलण्याची / एबझोरब करण्याची ताकद फक्त शनी मध्ये आहे. तुम्ही जर पूर्ण ताकदीने स्पंजच्या गाडीला मुक्का मारला तर काय होते? ती गाडी तुमचा फोर्स शोषून घेते आणि तिथेच सगळे संपते. पण तेच तुम्ही एखाद्या टणक भागावर तोच प्रयोग केला तर हाताला इजा होईल आणि तो भागही तुटेल किंवा वाकेल. हाच फरक आहे मंगळाला शनीची पत्रिका मॅच करण्यात आणि मंगळाला मंगळाची पत्रिका मॅच करण्यात मंगळ शनि थोडी शांतता दाखवू शकतात पण दोघेही मंगळ असतील तर एकाच्या हातात लाटण आणि एकाच्या हातात परात दिल्यासारखं होईल.


त्यामुळे आधी खरंच मंगळ किती स्ट्रॉंग आहे हे तपास आणि त्या नुसार अनुरूप जोडीदार निवडा

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn