चातुर्मास
आषाढ महिना – 4 था चंद्र मास, जेव्हा सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा शुक्ल पक्षाच्या 11 व्या तिथीला येणारी देवशयनी एकादशी पासून, जेव्हा सूर्य तुळ राशीतून संक्रमण करतो, म्हणजेच देवप्रबोधिनी एकादशी पर्यंत जी कार्तिक महिना – चंद्र मासातील ८ व्या महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 11 व्या तिथीला म्हणतात. ह्या संपूर्ण काळाला भारतभर चातुर्मास म्हणून संबोधले जाते.
असे मानले जाते की चातुर्मासात देव झोपलेले असतात, म्हणून देवशयनी (शयनी = झोपी गेलेले) असे नाव पडले. ही संज्ञा भगवान विष्णूच्या योगनिद्रा रूपाशी संबंधित आहे. जेव्हा देव जागे होतात, तेव्हा हा कालावधी संपतो, म्हणून देवप्रबोधिनी (प्रबोध = जागरण) असे नाव आहे. चातुर्मास हा काळ विवाह आणि तत्सम इतर सोहळ्यांसाठी अशुभ मानला जातो आणि तपश्चर्या, उपवास, पवित्र नद्यांमध्ये स्नान इत्यादी धार्मिक कार्यांसाठी अतिशय शुभ मानला जातो.
चातुर्मासचा शाब्दिक अर्थ ‘चार महिने’ असा अनुवादित केला जातो आणि इंग्रजी कॅलेंडर नुसार जून – जुलैच्या आसपास पावसाळ्यात सुरू होतो आणि ऑक्टोबर – नोव्हेंबर पर्यंत संपतो. वेगवेगळ्या प्रदेशात याला अनेक नावांनी ओळखले जाते: तेलुगु मध्ये टोली, महाराष्ट्रात आषाढी एकादशी आणि उत्तरेत महा एकादशी. देवपोळी, पद्म एकादशी, हरि शयनी एकादशी ही काही दुर्मिळ नावे आहेत.
परंपरेप्रमाणे, याचे तार्किक स्पष्टीकरण आसे कि, पावसाळा आल्यावर रोगराईचा फैलाव झपाट्याने होतो. उपवास आणि पवित्र विधींचे पालन केल्याने आरोग्य वाढते, ह्या कालावधीत पोटात गॅसचा त्रास होणे, अपचन अश्या त्रासांपासून बचाव करण्यासाठी चातुर्मासात कांदा आणि लसूणाचा वापर खाण्यामध्ये टाळतात.
जरी विवाहा सारखे संस्कार वर्ज केलेले असले तरी चातुर्मास हा सणांनी भरलेला असतो आणि त्या काळात गुरु पौर्णिमा; कृष्ण जन्माष्टमी; रक्षाबंधन; गणेश चतुर्थी; नवरात्री, दसरा, दिवाळी सारखे सण साजरे होतात.
चातुर्मासाशी संबंधित एक कथा वाचूया. बळी राजा हा असुरांचा राजा आणि भक्त प्रल्हादचा नातू होता. त्रैलोक्यांवर त्याच्या वाढत्या सामर्थ्यामुळे घाबरलेल्या इंद्राने भगवान विष्णूला संरक्षणासाठी प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळी राजाला भेट दिली. त्याने राजाला 3 पावलांइतकी जमिन भेट मागितली. बळी राजाला वामनाच्या ह्या मागणीचे खूप हसू आले. तो ब्राह्मणाची इच्छा पूर्ण करण्यास तयार झाला.
परंतु झाले भलतेच, वामनाच आकार प्रचंड मोठा झाला आणि त्याने एका पावलात पृथ्वी झाकली आणि दुसऱ्या पावलात स्वर्गलोक. तो दुसरा कोणी नसून विष्णू असल्याचे बळीला समजले आणि स्वतःची चुकाही. वाचन पूर्ण करण्यासाठी त्याने वामनाला स्वतःचे मस्तक अर्पण केले. हेच खरे महानतेचे लक्षण होते. ब्राह्मणाला दूर करण्याऐवजी त्यांनी स्वतःचा त्याग केला. वामनने त्याचा प्रस्ताव स्वीकारला आणि त्याच्या पावलाने त्याला पुन्हा नरकामध्ये ढकलले.
त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्याला त्याची इच्छा पूर्ती करून घेण्याची संधी दिली. बळीने फक्त हात जोडून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला दर वर्षातील एक तृतीयांश काळ आपल्या निवासस्थानी राहायला येण्याची विनंती केली. म्हणून, चार महिन्यांचा कालावधी, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी बाळीच्या घरी विश्रांती घेतात आणि आपण ध्यान आणि प्रायश्चित्त विधी पाळतो.
यावर्षी चातुर्मास रविवारी 10 जुलै रोजी सुरू होईल आणि शनिवारी 5 नोव्हेंबर रोजी संपेल.
Contact
Phone No. : 91+ 749 9846 591
Email: mrunal@vedikastrologer.comOffice Address
Address: Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.
Home Address
Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044
Blogs
Copyright © 2026 Vedik Astrologer | Powered by MI Tech Solutions






