Search for:
muhurta

मुहूर्त

प्रत्येक व्यक्तीला आपण करत असलेल्या कृतीचे, कार्याचे किंवा पोज विधींचे सकारात्मक परिणाम हवे असतात. त्यामुळेच आपल्यापैकी बरेच जण मुहूर्तावर कृती / कार्य करून नशिबाला साथ देण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला असे वाटते का की एकच वेळ प्रत्येकासाठी फायदेशीर असू शकते? केवळ शुभ दिवस आणि वेळ निवडून यश निश्चित करता येते?

कार्याच्या स्वरूपानुसार आणि व्यक्तीच्या कुंडलीशी तुलना करून पंचागा मधून (वैदिक कॅलेंडर) निवडलेल्या शुभ दिवस आणि वेळेला मुहूर्त म्हणतात.

जन्म कुंडलीमध्ये ती घटना घडण्याचा अंदाज वर्तवला असल्यास मुहूर्त कालावधीतील परिणामाची शक्यता किंवा सकारात्मकता वाढते. आपल्या ऋषीमुनींनी वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी / विधींसाठी पंचांगातील घटकांचे वेगवेगळे संयोजन सुचवलेले आहेत.

बरेच लोक पंचांगमध्ये नमूद केलेल्या तयार तक्त्यातील मुहूर्तच बघतात. मात्र मुहूर्ताची जन्मपत्रिकेशी तुलना करूनच निवड करावी लागते हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

मुहूर्त निवडण्याचा अर्थ असा नाही की शुभ तारखांपैकी आणि वेळांपैकी एक निवडले कि ते प्रत्येकासाठी चालेल. येथे एखाद्या व्यक्तीची जन्म कुंडली प्राधान्याने विचारात घेतला पाहिजे.

मुहूर्त हा व्यक्तीची जन्मपत्रिका पाहून निवडला जातो. पहिली पायरी म्हणजे जन्म पत्रिका वाचून घटना घडणे त्या व्यक्तीच्या नशिबात आहे की नाही याची पुष्टी करणे. जन्म पत्रिकेवरून जर घटनेची पुष्टी होत असेल, तर दुसर्‍या टप्प्यात महादशा आणि गोचर प्रणालीचा वापर करून ती घटना कधी घडू शकते या कालावधीचा अंदाज बांधता येतो.

यानंतरचा अंतिम टप्यात म्हणजे मुहूर्त होय. याचा अर्थ अनेक शुभ तारखांमधून आणि वेळांमधून जातकाच्या जन्म कुंडली नुसार सगळ्यात जास्त अनुरूप अशी तारीख व वेळ निवडणे.

कुंडलीमध्ये एकूण 12 भाव असतात त्यापैकी काही अशुभ तर काही अशुभ भाव मानले. मुहूर्ताची निवड करताना 2 प्रकारच्या कुंडल्या काढल्या जातात, एक जातकाची जन्म कुंडली आणि दुसरी मुहूर्त (गोचर) म्हणून निवडलेल्या वेळेची कुंडली. त्यामुळे नियमानुसार मुहूर्त कुंडली मधले मुख्य भाव (लग्न किंवा कार्येश भाव) हे व्यक्तीच्या जन्म कुंडलीतील अशुभ भावांशी मिळते जुळते नसावेत. (राशी आणि ग्रह), अन्यथा कार्याचा किंवा पुजेचा फायदा होणार नाही आणि त्या व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

म्हणून लग्न समारंभ, गृह प्रवेश, उद्घाटन, लक्ष्मीपूजन, इत्यादीसारख्या शुभ कार्य. समारंभ, पूजेसाठी योग्य मुहूर्त निवडण्याचा सल्ला दिला जातो, जेथे कृतींचे सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत.

[INSERT_ELEMENTOR id="1382"]