रुद्राक्ष
रुद्राक्षाच्या वृक्षाचे वनस्पतीशास्त्रीय नाव ‘एलिओकार्पस गेनिट्रस’ असे आहे. ह्या वृक्षाला बोराच्या आकाराची फळे येतात आणि या फळांच्या आत जे बीज मिळते तो रुद्राक्ष. प्रभू शिव स्वतः रुद्राक्ष माळा धारण करतात. ‘रुद्राक्ष’ हा शब्द ‘रुद्र’ (शिवाचे संहारक रूप) आणि ‘अक्ष’ (डोळा) ह्या दोन मूळ शब्दांपासून तयार झालेला एक जोड शब्द आहे.
जरी रुद्र प्रक्षोभासाठी जाणला जात असे तरी वास्तविकतः रुद्राक्ष शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी वापरला जातो. रुद्राक्ष आपल्या तापट स्वभावाला स्वतः मध्ये पकडून ठेऊन बुद्धी, तर्क आणि स्पष्टपणा उमलवण्यात मदत करतो.
रुद्राक्ष फक्त ऋषी आणि मुनी धारण करतात असे मानले जायचे परंतु सर्व जाती, जमाती, लिंग, वयाचे लोक धारण करू शकतात. प्रत्येक रुद्राक्षाचे विविध जीवन क्षेत्रात आणि विविध व्यक्तींनुसार, स्वतःचे विशिष्ठ गुण असतात. रुद्राक्षाचे वर्गीकरण त्यावरील असणाऱ्या उभ्या रेषांवरून केले जाते, ज्याला ‘मुख’ असे म्हणतात. १ ते २१ मुखी रुद्राक्ष पाहायला मिळतात, त्यातील १ – १४ मुखी रुद्राक्ष सामान्य असतात व बाकी क्वचितच पाहायला मिळतात.
• एकमुखी रुद्राक्ष साक्षात शिव रूप असून तो फक्त ऋषी मुनींनी धारण केला पाहिजे कारण हा रुद्राक्ष या भौतिक विश्वापासून अलिप्तता दर्शवतो आणि अध्यात्मिकतेचा प्रतिक आहे.
• द्विमुखी रुद्राक्ष शिवाचे अर्धनारीश्वर रूप दर्शवतो, म्हणून हा रुद्राक्ष लग्न झालेल्या लोकांनी धारण करावा.
• त्रिमुखी रुद्राक्षात अग्नी तत्व असते जे पूर्व भूतकाळातील तणावाचे निवारण करते आणि चित्तवृत्ती संतुलित ठेवण्यात मदत करते.
• चतुर्मुखी रुद्राक्ष बृहस्पती आणि त्यांच्या सज्ञान स्वरूपाशी जोडलेला आहे. ज्या लोकांना बुद्धी, विचारशक्ती उत्तेजित करायची आहे आणि लाजाळूपणा कमी करायचा आहे त्यांनी चतुर्मुखी रुद्राक्ष धारण करावा.
• षण्मुखी रुद्राक्ष १४ वर्षाखालील मुलांसाठी योग्य आहे कारण ह्यामुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्यवस्थित होतो.
• सप्तमुखी रुद्राक्ष लक्ष्मीरूप आहे त्यामुळे जे लोक आर्थिक सुबत्तेच्या शोधात आहे त्यांनी हा रुद्राक्ष धारण करावा.
• अष्टमुखी रुद्राक्ष, ज्याला विघ्नहर्ता असेही म्हंटले जाते, गणपतीचे स्वरूप असून जीवनातील अडथळ्यांचा नाश करण्यात मदत करतो.
• नवमुखी रुद्राक्ष दुर्गारूप असून आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती वाढवण्यास मदत करतो.
• दशमुखी रुद्राक्ष विष्णुरूप आहे जो गोंधळातही स्थितप्रज्ञ राहण्यास मदत करतो. नवमुखी रुद्राक्षासारखाच हा देखील आत्मविश्वास वाढवतो.
• एकादशमुखी रुद्राक्ष धारण केल्याने वस्तूनिष्ठ निर्णय घेण्यात मदत होते आणि ज्ञानेंद्रीयांवर आणि शब्दसंग्रहावर प्रचंड ताबा मिळतो.
• द्वादशमुखी रुद्राक्ष त्याच्या तेज आणि चैतन्यासाठी ओळखला जातो. सूर्याची उज्ज्वल बाजू दर्शवून हा रुद्राक्ष निश्चयीपणा वाढवतो.
• गौरी-शंकर (त्रयोदशमुखी) रुद्राक्ष १४ वर्षावरील सर्व लोक स्वतःचे अंतर्गत संतुलन राखण्यासाठी धारण करू शकतात. असे मानले जाते कि हा रुद्राक्ष सप्त चक्रासाठी जबाबदार असलेल्या इदा आणि पिंगळा नाडींचे संतुलन राखतो.
• चतुर्दशमुखी रुद्राक्ष हनुमानरूप असून ताकद आणि निश्चयीपणा दर्शवतो.
• पंचदशमुखी आणि शोडषमुखी रुद्राक्ष सगळ्या शारीरिक विकारांचे निवारण करतात. पंचदशमुखी रुद्राक्ष खिन्नता, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व श्वसना संबंधी दोषांपासून मुक्तता मिळवतो.
• या सगळ्यांमधील सर्वसामान्य म्हणजे पंचमुखी रुद्राक्ष जो मन शांत ठेवण्यात, एकाग्रता, पाठांतराची क्षमता वाढवण्यात मदत करतो.
आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की रुद्राक्ष धारण करणे हे एक वचन आहे आणि ते निर्धारित प्रथांप्रमाणेच केले पाहिजे; वापरण्याआधी रुद्राक्ष पवित्र केला पाहिजे. आपण कुठल्या पद्धतीने रुद्राक्ष बाळगतो ह्यावर त्याची शक्ती ठरते, न की त्याच्या आकारावर. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी तो उर्जित आणि संस्कारित केला पाहिजे; प्रथेनुसार रुद्राक्ष पहिले २४ तास साजूक तुपात बुडवून ठेवायचा असतो आणि त्यानंतर पुन्हा २४ तास दुधात बुडवून ठेवायचा असतो. त्याला नंतर कापडाने स्वच्छ करून मगच धारण करावा. दर ६ महिन्यांनी किंवा दर वर्षी रुद्राक्षावर संस्कार करून त्याला उर्जित करावे.
ब्राम्हणाच्या जानव्यासारखे रुद्राक्षहि धारण करणाऱ्या व्यक्तीच्या अंगाशी आणि त्याचा शक्तींसोबत एकनिष्ठ होतो. एकदा शपथ घेतल्यानंतर रुद्राक्ष बाकी दागीन्यांसारखा इकडे तिकडे ठेऊ नये व इतर कोणालाही देऊ नये. स्वतःची शारीरिक स्वच्छता राखताना रुद्राक्ष एका स्वच्छ जागी ठेवावा किंवा एका मुलायम कापडात गुंडाळून इतर वस्तूंपासून लांब ठेवावा.
आतापर्यंत आपण एका रुद्रक्षाबद्दल पहिले, आता आपण रुद्राक्षाच्या जपमाळेबद्दल माहिती घेऊ. याचे संस्कार देखील रुद्राक्ष मणी प्रमाणेच असते. सर्वसाधारणपणे जप करताना १०८ मणी असलेली जपमाळ वापरली जाते परंतु रुद्राक्ष माळेत १०८ मणी असणे आवश्यक नाही. रुद्राक्ष माळेत शक्यतो ८४ मणी वापरले जातात कारण १०८ मणी असलेली माळ लांबीला मोठी होऊन त्याचा इतर वस्तूंशी संपर्क होऊ शकतो.
या रुद्रक्षाकडून तुम्हास शांतपणा आणि स्थैर्य लाभो.
Contact
Home Address
Phone No. : 91+ 749 9846 591
Email: mrunal@vedikastrologer.com
Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044
Office Address
Address: Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.
Map
Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.
Copyright © 2026 Vedik Astrologer | Powered by MI Tech Solutions






