
षडाष्टक
खूप लोक “षडाष्टक योग आहे” म्हणलं कि घाबरून जातात. बऱ्याच लोकांना त्याचा नीट अर्थही माहित नसतो किंवा त्याबाबतीत संपूर्ण माहिती तरी नसते.
षडाष्टक ह्या शब्दावरून एवढे तर कळतेच कि हा विषय ६ (षड) आणि ८ (अष्टक) संबंधित आहे. मग नक्की काय असता हे ? ह्याचा संबंध जास्त करून लग्नात पत्रिका जुळवताना येतो.
दोन व्यक्तींची कुंडली घेतली तर प्रत्येक कुंडली मध्ये १ ते १२ आकडे असतात आणि प्रत्येक कुंडली मध्ये एका आकड्यापाशी चंद्र (चं) लिहिलेले असते. ती झाली त्या व्यक्तीची चंद्रराशी (आपण नेहमी पेपर /मासिका मध्ये जे पाहतो ती हीच रास). कुंडली मध्ये १२ भाव (घरं) असतात त्यातील ६ वा भाव हे अरी भाव तर ८ वा भाव मृत्यू स्थान म्हणून ओळखले जाते. म्हणजेच हे भाव अशुभ मानले जातात.
त्याचाच संदर्भ घेऊन आपण जर एका व्यक्तीची चंद्र राशी दुसऱ्या व्यक्तीच्या चंद्र राशी पासून ६ वी किंवा ८ वी येत असेल तर ती अशुभ मानली जाते. असे मानले जाते कि त्या दोघांच्या मध्ये कायम वितुष्ट येऊ शकते, शत्रुत्वाची भावना तयार होऊ शकते, आयुष्यातील अनेक गोष्टीं मध्ये एकासाठी दुसरा अडथळा बनूशक्तो, म्हणजेच संसार सुखाचा होऊ शकत नाही.
उदाहरणार्थ: एक व्यक्तीची चंद्र राशी मेष असताना दुसऱ्याची चंद्र राशी कन्या असेल तर ती मेष राशी पासून ६ वी राशी आहे तर कन्या राशी पासून मेष राशी हि ८ वी राशी आहे. त्याबरोबरच ह्या राशीची स्वामी मंगल आणि बुध हे शत्रू आहेत.
तसेच जर एका व्यक्तीची चंद्र राशी कुंभ धरली आणि दुसऱ्या वक्तीची चंद्र राशी जर आपण कर्क धरली तर ती कुंभे पासून कर्क ६ वी राशी येते आणि कर्के पासून कुंभ ८ वी राशी येते. इथे सुद्धा ह्यांचे स्वामी शनी – चंद्र शत्रू आहेत. त्यामुळे कर्क आणि कुंभ राशीच्या व्यक्ती एकमेकांसाठी अशुभ ठरतील.
ह्याच योगाला “मृत्यू षडाष्टक” असे हि म्हणले जाते. परंतु दर वेळेस ते जीवावर बेतण्याइतके धोकादायक असेलच असे नाही. त्यासाठी कुंडलीतील इतरही ग्रह स्थिती पडताळून पहावी लागते. पण जर हा योग होत असेल तर संसारात मिठाचा खडा पडतो हे नक्की. ह्या अशुभ षडाष्टकात मोडणाऱ्या राशींच्या जोड्या पुढील प्रमाणे.
मेष-कन्या, मिथुन-वृश्चिक, सिंह-मकर, तुला-मीन, धनु-वृषभ, कुंभ-कर्क
ह्या ६-८ च्या जोड्या (षडाष्टक) दर वेळेस वाईटच असतील असे नाही. ह्यातील काही जोड्या ह्या शुभ मानल्या जातात. त्याला “प्रीती षडाष्टक” असे म्हणतात. जेंव्हा एका व्यक्तीच्या चंद्र राशीचा स्वामी हा दुसऱ्या व्यक्तीच्या चंद्र राशीचा स्वामीचा मित्र असतो किंवा ह्या दोन्ही राशी एकाच ग्रहाच्या असतात तेंव्हा त्याला प्रीती षडाष्टक म्हणजेच शुभ योग म्हणतात. येथे दोन्ही राशींचा स्वामी एकाच असल्याने कुठलाही धोका नसतो तसेच जर ते स्वामी मित्र असतील तरीही ते एकमेकांसाठी अनुरूपच ठरतात. म्हणूनच म्हणतात कि लग्न जुळवताना नवरा-नवरीच्या बाबतीत हा योग टाळावा. ह्याच पद्धतीने प्रत्येक राशीसाठी एक रास हि षडाष्टक योगात येते. शुभ षडाष्टकात मोडणाऱ्या राशींच्या जोड्या पुढील प्रमाणे.
वृषभ-तुला, कर्क-धनु, कन्या-कुंभ, वृश्चिक-मेष, मकर-मिथुन, मीन-सिंह
ह्या शिवाय लग्न जुळवताना आधी गुण-मिलन आणि मग दोघांच्या पत्रिकेचे संपूर्ण परीक्षण करणेही तितकेच गरजेचे असते.
शेवटी हे शास्त्रच आहे, थोतांड नाही.
Copyright © 2025 Vedik Astrologer | Powered by MI Tech Solutions