भाग - १ वर्ण कूट (गुण मिलन)
माझ्या मागच्या लेख मध्ये आपण वधू-वरांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी गुणमिलनाचे महत्व व फायदे ह्याबद्दल चर्चा केली. आता पाहुयात कि गुणमिलन नक्की कशी मदत करते. हे समजण्यासाठी तुम्हाला ज्योतिष विद्येचे ज्ञान असण्याची आवश्यकता नाही. पंचांग मध्ये ह्या बद्दल व्यवस्थित माहिती दिलेली असते. आपल्याला त्याचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे.
अष्टकुटा मधे वर्ण, वैश्य, तारा, योनी, ग्रह मैत्री, गाणं, राशी कुट, आणि नाडी या ८ घटकांचा विचार केला जातो जे वधू-वर एकमेकांसाठी किती आणि कसे अनुरूप आहेत हे स्पष्ट करते. अष्टकुटा मधे एकूण ३६ गुणांचे गणित मांडले जाते ज्या मधे प्रत्येक घटकाचे वैयक्तिक गुणांचा समावेश असतो.
ह्या अष्टकुटा पैकी आपण आज पहिला घटक वर्ण कूट बद्दल जाणून घेऊयात. वर्ण कूट हे अष्टकूटतील ३६ गुणांपैकी जास्तीत जास्त १ गुणाचे योगदान देते.
वर्ण कूटचा आणि सध्याच्या काळातील जाती प्रथेचा काही हि संबंध नाही. वेदिक काळामध्ये कामासाठी माणसांची विभागणी हि कुटुंबाच्या परंपरे नुसार न करता त्यांच्यातील कुशलता पाहून केली जायची. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे ४ वर्णांची रचना त्याकाळी केली गेली. कलियुगा मधे राजकीय फायद्यासाठी त्याचे रूपांतर जाती भेदा मधे झाले.
वर्ण हे मानवातील गुणवत्ता दर्शवते. ब्राह्मणाच्या घरी जन्मलेला एखादा माणूस क्षत्रिय गुणांचा असू शकतो किंवा एखाद्या शूद्र कुटुंबातील व्यक्ती वैश्य गुणांचा असू शकतो.
ब्राह्मण वर्ण (विप्र) हे पाठांतराची क्षमता, हुशारी, समंजसपणा, विचारपूर्वक कृती, प्रतिष्ठा, धार्मिक कार्यांचे सखोल ज्ञान दर्शवते.
क्षत्रिय वर्ण हे व्यक्तीचा निडरपणा, बळकट शरीरयष्टी, कष्टाळूपणा, अहंकार, स्वाभिमान दर्शवते.
वैश्य वर्ण हे व्यापार बुद्धी, व्यवहारीपणा, हिशोबी वृत्ती संबोधित करते.
शूद्र वर्ण हे सेवा किंवा आदेशपालनाची वृत्ती दाखवते.
आधी आपण शूद्र ह्या शब्दाचा खरा अर्थ जाणून घेऊयात. जी व्यक्तीच्या अंगची गुणवत्ता हि इतर तीनही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णाच्या तुलनेत कमी आहे अश्या व्यक्तीस शूद्र असे संबोधले जायचे. हि व्यक्ती बाकीच्या ३ वर्णातील व्यक्तींना सहाय्यक म्हणून काम करीत असत.
प्रत्येक वर्ण सम वर्णाशी जुळवल्यास पूर्ण गुण दर्शवते. वर्ण कुटाच्या अभ्यासावरून असे समजते कि मुलासाठी सम वर्ण किंवा स्वतः पेक्षा कमी वर्णाची मुलगी चालतात, परंतु मुलीच्या बाबतीत मात्र सम किंवा उच्च वर्णाचाच मुलगा योग्य ठरतो. ह्याची रचना कदाचित पुरुषप्रधान संस्कृती किंवा स्त्रियांच्या सन्मानाच्या आणि आर्थिक दर्जाच्या उन्नतीसाठी केला गेला असेल.
जर वर्ण कुटा मधे वधू-वारांचे गुण जमले नाहीत तर लग्न टाळण्याची गरज नसते. ह्याचा अर्थ असा घ्यायचा कि वधू-वारांमधील गुणवत्ता न जुळल्यामुळे सामंजस्य कमी असेल.
वधुवरांमधील वर्ण कूट जुळवण्यासाठी पुढील तक्त्याचा वापर करा:
वर→ वधू↓ | ब्राह्मण(विप्र) | क्षत्रिय | वैश्य | शूद्र |
| ब्राह्मण(विप्र) | 1 | 0 | 0 | 0 |
| क्षत्रिय | 1 | 1 | 0 | 0 |
| वैश्य | 1 | 1 | 1 | 0 |
| शूद्र | 1 | 1 | 1 | 1 |
Contact
Phone No. : 91+ 749 9846 591
Email: mrunal@vedikastrologer.comOffice Address
Address: Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.
Home Address
Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044
Blogs
Copyright © 2026 Vedik Astrologer | Powered by MI Tech Solutions






