Search for:

मोती कुणी कुणी घालावा ?

आपण खूप लोकांना हातात मोती घालताना बघतो. तसेच आपल्यालाही काही आप्तेष्ट किंवा जोतिषी मोती घालायला सांगतात. आणि मग मनात वादळ उठतं…


मी मोती घालावा का? कोणत्या रंगाचा? कुठल्या मापाचा? सोन्यात कि चांदीत? त्याने काय होईल? हे आणि असे अनेक प्रश्न सटवायला लागतात. चला बघूया ह्यांची उत्तर काय आहेत ते.


सगळ्यात पहिला हे समजून घेणे गरजेचे आहे कि कुठले हि रत्न किंवा मोती घातल्याने व्यक्तीच्या मूळच्या स्वभावात कायम स्वरूपी बदल घडत नाहीत. हे बदल दिसले तरी ते तात्कालिक असतात (टेम्पररी).


मोती कोणी घालावा आणि का ह्या दोन्हीचे उत्तर सेम आहे. आधी आपण “मोती का?” हे समजून घेऊयात.


जोतिष शास्त्रा प्रमाणे प्रत्येक ग्रहाचे प्रतिनिधित्व एक रत्न करतं, त्या प्रमाणेच मोती हा चंद्राचे प्रतिनिधित्व करतो. चंद्र हा जल तत्वाचा आहे, आपल्याला त्याचा दिसणारा रंग हा पांढरा आहे. त्यामुळे तो शांत, शीतल आणि कोमल गुण दर्शवतो. पांढरा रंग हा नेहमी शुद्धता, साधेपणा, पारदर्शकता आणि स्वच्छता दर्शवतो. नैसर्गिक रित्या तयार झालेला मोती (नॅचरल पर्ल) हा शिंपल्यात मिळतो आणि शिंपला हा पाण्यात सापडतो आणि बहुतांश वेळा तो पांढराच असतो (वेगळ्या रंगाचे मोती हि मिळतात पण त्याचे प्रमाण कमी असते). त्यामुळे मोत्याला चंद्राचे प्रतिनिधित्व मिळाले असावे. जसा चंद्राचा दिसणारा रंग हा अगदी शुभ्र पंधरा नाही तसाच नॅचरल मोती देखील पांढरा शुभ्र नसतो. ऑफव्हाईट म्हणतात तसा हलकासा फिकट/गुलबट पांढरा असतो.


असा हा मोती जो चंद्राचे प्रतिनिधित्व करतो आणि चंद्र माणसाच्या मनाचे. माणसाचे मन खूप नाजूक असते आणि चंचल पण असते. मोत्याचा वापर योग्य रित्या केल्याने त्याच्या तत्वांचा / गुणांचा (शांत, शीतल, कोमल) आपल्यावर अगदी हळुवारपणे परिणाम होऊ शकतो. जर व्यक्ती रागीट किंवा तापट स्वभावाची असेल तर मोत्याच्या सतत वापराने मोत्याचे गुण त्याला थोडाफार शांत करू शकतात. जर कोणी उदास, डिप्रेसड असेल, नर्व्हस असेल, निर्णय क्षमता कमी वाटत असेल, खूप अस्वस्थ वाटत असेल तर मोत्याच्या वापराने त्यात काही प्रमाणात सुधारणा दिसू शकते. मोत्याच्या वापराने व्यक्तीचा स्वतःच्या मनावर सैयम वाढतो, विचार कारण्यासाठी मनाला स्थैर्य मिळते, घालमेल कमी होते आणि भीती वाटणे किंवा संशयी स्वभावाला थोडाफार आळा बसू शकतो.


असं म्हणतात कि जर जन्म कुंडली मध्ये चंद्र हा राहू-केतू बरोबर स्थित असेल तर त्यांनी मोती वापरू नये. तरी प्रत्यक्ष कुंडली परीक्षण करून त्या बद्दल ठाम मत देता येईल.


बाजारात मोत्यांचे अनेक प्रकार आणि रंग उपलब्ध आहेत. त्यातील खरा मोती ओळखणे गरजेचे आहे कारण हल्ली फसवेगिरीहि खूप होत आहे. खरा मोती हा भरीव असतो आणि अगदी परफेक्ट गोल नसतो. किंचित आकारात फरक असतो. वजनही तसं जाणवेल इतका असतं. त्या उलट प्लास्टिक / सिंथेटिक मोती हे परफेक्ट गोल असतात, वजनाने खूप हलके असतात आणि सगळे अगदी सेम आकाराचे आणि रंगाचे चकचकीत असतात. अजून एक प्रकार म्हणजे कृत्रिम (आर्टिफिशिअल) मोती, असे म्हणतात कि शिंपल्यांची शेती केली जाते आणि शिंपल्यांचा विशिष्ठ रसायनांशी संबंध आणला जातो ज्यामुळे त्यातील जीव जास्तीत जास्त मोती बनवतात. म्हणजे हे बनतात शिंपल्या मधेच पण ते नैसर्गिक रित्या नबंता जबरदस्तीने त्या जीव कडून मिळवले जातात.


मग विचार येतो, कश्या मध्ये घालायचा? खरंतर मोती चांदीतच घातला पाहिजे असं नसतं. ते अवलंबून असतं त्या व्यक्तीच्या कुंडलीवर. एक जोतिषीच सांगू शकतो कि त्या व्यक्तीला अग्नी तत्वाची गरज आहे कि जल तत्वाची. जर मानसिक स्थैर्यां बरोबर थोडं मानसिक बळ वाढवणे किंवा धैर्य वाढवण्याची गरज असेल किंवा इतर कुठल्याही कारणास्तव अग्नी तत्वाचा वापर करायचा असेल तर सोन्या मध्ये मोती घालू शकतो. पण मुळातच अग्नी तत्व जास्त जाणवत असेल तर चांदी वापरून त्या अग्नी तत्वावर काही प्रमाणात मात करता येते कारण चांदी सुद्धा धातू या विभागात चंद्राचे प्रतिनिधित्व करते.


आता उरतो प्रश्न कोणत्या बोटात घालायचा? मोती जर अंगठीत बांधला तर तो करंगळीत घालतात, पुरुष उजव्या हाताच्या आणि बायका डाव्या हाताच्या करंगळीत. पण माझ्या गुरूंनी शिकवलेला प्रकार मला जास्त पटतो. तो म्हणजे मोती हा लॉकेट मध्ये बांधून गळ्यात घालणे. आपण जेंव्हा हातात मोती घालतो तेंव्हा त्याला कळत-नकळत इतरांचा स्पर्श होत असतो, आपण उष्ट्य-खर्कट्यात हात घालत असतो, टॉयलेटला जातो अश्या अनेक कारणाने ते दूषित होत असते. जर मोत्याचे पावित्र्य राखले जात नसेल तर ते मनासारख्या नाजूक गोष्टींबाबत चांगली फळे कसे देईल? म्हणून मोती हा गळ्यात घालावा. पुन्हा सोन्याच्या कि चांदीच्या ह्यासाठी तोच नियम लागू होतो.


जर मोतीचा वापर सुचवला असेल तर तो खरा आणि पांढरा मोती असावा आणि शक्यतो गळ्यात घालावा.

[INSERT_ELEMENTOR id="1382"]