Astrology is a myth or fact
ज्योतिष हे थोतांड नसून शास्त्र आहे, जे सिद्ध करता येते आणि म्हणूनच ते सत्य आहे. ज्योतिष विषयक कोणताही अंदाज व्यक्त करण्याआधी त्यामागील गणित आणि खगोल शास्त्राचा सखोल अभ्यास झालेला असतो. अनेक ऋषिमुनींनी आणि संशोधकांनी गणित आणि खगोल शास्त्राची अभ्यासपूर्ण सांगड घालून ज्योतिष शास्त्राची मांडणी केली आहे.
जे ज्योतिष शास्त्रावर टीका करतात तेच लोक खरंतर लपूनछपून नियमितपणे वृत्तपत्रातील दैनंदिन राशी भविष्य वाचत असतात
आणि त्यावर विश्वास ही ठेवत असतात. जसे प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते तसेच प्रत्येकाची कुंडलीही वेगळी असते. असं असेल तर मग रोजचे एका ओळीचे भविष्य एकाच राशीच्या लाखो करोडो लोकांना कसं काय लागू होईल?
ज्योतिष हा कोणत्याही समस्येवरील ठोस उपाय नसून ते एक मार्गदर्शक तत्व आहे. माझी कुंडली पाहून ज्योतिषी काही चमत्कार
घडवून आणेल आणि मला अपेक्षित फळ मिळवू देईल असं अनेकांना वाटत असते. पण खरं तर ज्योतिषी हा तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून काही अनुमान काढत तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. जेणेकरून तुमच्या शंकांचे निरसन होण्यास मदत होईल.
ज्योतिषी तुम्हाला एखादा उपाय सुचवतो तो तुमच्यातील सकारात्मकता आणि आशावाद टिकून राहील असा वैचारिक बदल व्हावा यासाठी. ज्योतिषी हे कोणतेही चमत्कार घडवू शकत नाहीत. परंतु नैराश्याच्या अंधारात ते नक्कीच आशेचा किरण बनून येतात. आपण ज्या मानसिक अवस्थेतून जात असतो त्या अनुषंगानेच आपण निर्णय घेत कृती करत असतो. तिला श्रद्धा आणि धार्मिक विधीची जोड देत आपले मनोबल वाढवत असतो.
ज्योतिष शास्त्राचे अंदाज जास्तीत जास्त अचूक ठरणे यात कौशल्य पणाला लागते. पण हे ही लक्षात घ्यायला हवं की तुम्ही वैदिक
शास्त्र किंवा इतर कोणत्याही पद्धतीचा अवलंब करा, जे विधिलिखित आहे ते अटळच.
ज्योतिष शास्त्र विस्ताराने सांगणं कठीण आहे पण एकदा का या शास्त्राचे मर्म तुम्ही जाणलं, तर ग्रह तारे तुमच्याशी नक्कीच बोलू
लागतील.
Contact
Phone No. : 91+ 749 9846 591
Email: mrunal@vedikastrologer.comOffice Address
Address: Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.
Home Address
Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044
Blogs
Copyright © 2026 Vedik Astrologer | Powered by MI Tech Solutions






