उपवास
उपवास हा हिंदुधर्मात पाळतात जसे इतर धर्मात पाळतात. शास्त्रीय द्रुष्ट्या उपवासाने आपल्या शरीराची शुध्दता होते. तसेच आत्मिक द्रुष्ट्या मनाचीही शुध्दता होते. शरीर हलकं वाटतं तसेच अस्वस्थता कमी झाल्याने मन शांत होतं आणि दक्ष रहातं. असे जेंव्हा होते तेंव्हा मन उपासनेसाठी, प्राणायाम साठी योग्य असतं. मुख्य म्हणजे उपवास करणे म्हणजे पोट रिकाम ठेवणे असा नाही. उपवास करताना पित्त होणार नाही याची काळजी घ्यावयास हवी.
उपवासाने शरीराची चयापचयाची क्रिया सुरळीत होते. तसेच मनातील नकारात्मक भावना जसे हव्यास, वासना, क्रोध आणि चिंता यांना मुक्ति मिळते. अति अन्न सेवनाने येणारी सुस्ती, आळस नाहीसे होतात मनात सकारात्मक विचार येतात.
उपवास हा हलकासा म्हणजे थोडेसे खाऊन किंवा तीव्र म्हणजे निराहार, निर्जळी असा केला जातो. उपवासाने पचनेंद्रियांना आराम मिळून त्यांची शुध्दता होण्यास मदत होते. उपवास हा आपले आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो. त्याने शरीरातील उष्मांक कमी होतात व हृदय, मधुमेह अशा व्याधींना दूर ठेवण्यासाठी प्रतिकार शक्ति मिळते.
उपवासाचे फायदे मिळावयास आपण उपवासा वेळी किंवा उपवास सोडताना कोणते पदार्थ निवडतो याला महत्व आहे. रात्री उपवास सोडताना जड किंवा पिष्टमय पदार्थ खाऊ नयेत. उपवासासाठी बर्याच पदार्थांवर निर्बंध आहेत. तरीही फळे, काकडी रताळी सारखी हंगामी पदार्थ घेऊ शकतो.
उपवास हा सर्व वयोगटा साठी आहे. परंतु लहान मुलांच्या शरीराला थोड्या थोड्या वेळाने काही पिष्टमय पदार्थांची आवश्यकता असते म्हणून समाजाने मुलांना उपवास वर्ज्य केला आहे. तसेच मधुमेही आणि गरोदर स्त्रियांनी उपवास टाळावा असे शास्रज्ञांचे मत आहे.
टीप: जर उपवासाची तिथी 2 इंग्लिश तारखांमध्ये विभागली जात असेल तर ज्या दिवशी तिथी सूर्योदयाच्या वेळी कार्यरथ असते त्या दिवशी उपवास करावा.
Contact
Phone No. : 91+ 749 9846 591
Email: mrunal@vedikastrologer.comOffice Address
Address: Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.
Home Address
Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044
Blogs
Copyright © 2026 Vedik Astrologer | Powered by MI Tech Solutions






