Search for:

भाग 5 - ग्रह मैत्री कूट (गुण मिलन)

कूटतील मधील 36 गुणांपैकी वर्ण, अवश्य, ताराचक्र, योनी प्रमाणेच ग्रहमैत्री कूट जास्तीत जास्त 5 गुणांचे योगदान देते. ग्रहमैत्री कुटा मध्ये वधू व वर यांच्या जन्म कुंडलीतील चंद्र राशींच्या मैत्री प्रमाणे 0, 0.5, 1, 3, 4 किंवा 5 गुण दिले जातात. एकूण बारा राशी असतात ज्यांचे स्वामित्व सात ग्रहांना दिले गेले आहे. जन्मकुंडलीत ज्या राशीमध्ये चंद्र असतो ती चंद्र रास होय.


पुढील प्रमाणे ग्रह व राशी यांचे विभाजन झाले आहे.

 

रवी ची राशी सिंह आणि चंद्राची राशी कर्क आहे, बाकी सर्व ग्रहांना प्रत्येकी दोन राशींचे स्वामित्व मिळाले आहे. मंगळाला मेष व वृश्चिक बुधाला मिथुन व कन्या गुरूला धनु आणि मीन शुक्राला वृषभ व तूळ आणि शनीला मकर व कुंभ राशींचे स्वामित्व मिळाले आहे.

जरुरी नाही की हे सात ग्रह एकमेकांचे चांगले मित्रच असतील किंवा शत्रुच असतील. काही ग्रह एकमेकांशी निष्पक्षता ही बाळगू शकतात. असेही पाहण्यात आले आहे की एक ग्रह दुसऱ्या ग्रहाला आपला मित्र मानतो परंतु त्याच वेळेस दुसरा ग्रह मात्र पहिल्या ग्रहाला निष्पक्ष भावाने पाहतो. आता पाहूया कुठला ग्रह कुठल्या ग्रहाचा मित्र आहे किंवा शत्रू आहे किंवा निष्पक्षता दाखवतो. ग्रह मैत्री कूट हे दाम्पत्याची मानसिक स्थिती दर्शवते, जर त्यांचे राशी स्वामी मित्र असतील तर त्यांचे विचार सामंजस्याचे असतील, मैत्रीपूर्ण असतील आणि जर राशीस्वामी एकमेकांचे शत्रू असतील तर दाम्पत्या मध्ये मतभेद असतील, काही वेळेस हे मतभेद विकोपाला जाऊ शकतात.

 

आता हे आपण सविस्तरपणे बघूयात:

 

वधू आणि वर यांच्या जन्म कुंडली येथील चंद्र राशी राशींचे स्वामी (जन्म कुंडली मध्ये जिथे चंद्र स्थित आहे)
– जर एकच आहेत तर 5 पैकी 5 गुण दिले जातील.
– जर एक ग्रह मैत्रीचा स्वभावत दाखवत असेल आणि दुसरा निष्पक्षता दाखवत असे तर 4 गुण मिळतील.
– जर दोन्ही ग्रह निष्पक्ष स्वभावाचे असतील तर 3 गुण मिळतील.
– जर एक ग्रह मैत्री दाखवत असेल व दुसरा ग्रह शत्रुता दाखवत असेल तर 1 गुण मिळेल.
– आणि जर दोन्ही ग्रह एकमेकांचे शत्रू असतील तर सर्वात कमी म्हणजेच शून्य गुण दिले जातील.

 

जेव्हा 0, 0.5 किंवा 1 गुण मिळतो तेव्हा हा दोष समजला जातो. आता दोष असेल तर मग लग्न मोडायचे का? वैदिक शास्त्राप्रमाणे कुंडलीमध्ये लग्न भावाला आत्यंतिक महत्त्व प्राप्त झाले आहे, जर वधू आणि वर यांच्या जन्म कुंडलीतील लग्न भावाचे स्वामी हे एकमेकांचे मित्र असतील तर लग्न होऊ शकते. कारण लग्न भाव हे जातकाचे व्यक्तिमत्व सांगते या प्रकारे आपण ग्रह मैत्री दोषांची तीव्रता कमी करू शकतो.

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn