Search for:

भाग ७ - राशि कूट (गुण मिलन)

राशी कूट ज्याला भकूट असेही म्हणतात, हा अष्टकूटाचा सातवा भाग आहे. राशी कूट अष्टकूटातील 36 पैकी जास्तीत जास्त 7 गुण देऊ शकते. लग्न जमवताना पती आणि पत्नी यांच्या जन्मकुंडलीतील चंद्र राशींचे इथे मिलन केले जाते. राशी कूट मध्ये पती-पत्नीच्या पत्रिकेतील चंद्र राशिंमधिल अंतर मोजणे गरजेचे आहे. जर पत्नीची चंद्र स्थानातील रास मेष असेल आणि पतीची चंद्र स्थानातील रास कर्क असेल, तर पत्नीच्या चंद्र राशी पासून पतीच्या चंद्र राशी पर्यंत असणारे अंतर ४ असते, व पतीच्या चंद्र राशी पासून पत्नीच्या चंद्र राशी पर्यंतचे अंतर 10 असते.


ह्या प्रकाराने सात जोड्यांचे मिलन होऊ शकते: 1-1, 2-12, 3-11, 4-10, 5-9, 6-8, 7-7.


ह्या जोड्यां मधील 2-12, 5-9, व 6-8 या तीन जोड्या अनुकूल मानल्या जात नाहीत. दुसरे स्थान धनसंचय दाखवते आणि बारावे स्थान हे व्यय किंवा क्षति दाखवते यामुळे ही जोडी (2-12) संपूर्ण जीवन काळात आर्थिक विवंचनेत राहू शकते. याच प्रमाणे पंचमस्थान पितृत्व/मातृत्व (संतती) दर्शवते आणि नवम स्थान आपणास उपभोगा पासून वंचित करते, अशा अप्रचलित गोष्टी दर्शवते. त्यामुळे प्रेम भावना सोडून धार्मिकते कडे ओढा निर्माण होतो. सहावे स्थान अनेक व्याधी अथवा शत्रुत्व दर्शवत आणि अष्टम स्थान मृत्यू/अंत, विसंगती, किंवा विवाह विच्छेद, आरोग्याच्या समस्या, आणि जोडीदाराचा मृत्यू दर्शवतो. अशा परिस्थिती मध्ये गुण मिलनाचा अंक शून्य (0) होतो.


बाकीच्या गुणमिलन आत्मक जोड्या विवाहासाठी अनुकूल असतात असे मानले जाते आणि त्यांचे गुणमिलन अंक दांपत्यास साठी 36 पैकी 7 असतात हे दाम्पत्य त्यांचे उत्तम संबंध दर्शवितात. चंद्र मनुष्य शरीरात मनाचे प्रतिनिधित्व करतो आणि गुणमिलन चांगले असेल तर दांपत्या मध्ये सहमती व सहजीवन चांगले असते, आपसात केलेले समझोते हे उत्तम फळ देतात.
जर पती आणि पत्नीच्या राशीचा स्वामी चंद्र असेल किंवा दोघे एकमेकांचे मित्र असतील तर राशीकूट (भकूट) चे दोष लागू होत नाहीत.

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn