नवरात्रीचे प्रकार
भारतात ‘नवरात्री’ चा हा उत्सव संपूर्ण देशभर साजरा केला जातो. पण तुम्हाला हे माहित आहे का, की भारतात दर वर्षी एकूण चार नवरात्रींचा उत्सव देवीच्या उपासनेसाठी केले जातात…
पहिले नवरात्र ‘चैत्र नवरात्री’ यालाच ‘वसंत नवरात्री’ असेही म्हणतात. हे नवरात्र चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजेच, गुढी पाडवा या हिंदुंच्या नव वर्षदिनी सुरुवात होते व राम जन्म दिनी नवमीला समाप्ती होते. वसंत नवरात्रीपासून निसर्गात नवी पालवी फुटुन निसर्गात खूप सुंदर बदल होतो. नवरात्र मध्ये दुर्गा मातेच्या नऊ रूपांची उपासना केली जाते. ह्या दिवसात भक्त कडक उपवास पाळून शरीराला ऋतू संधीसाठी तयार करतात, त्यामुळे अपचनासारखे आजार टळतात. उत्तर व पच्छिम भारतात हे नवरात्र जास्त प्रमाणात साजरे केले जाते.
आणखी दोन नवरात्री ह्या आषाढ व माघ महिन्यात येतात. ह्या नवरात्री जास्त प्रचलित नसल्याने त्यांना गुप्त नवरात्री असेही म्हणतात. ह्या दोन नवरात्री तंत्र-साधना करणार्या साधकांसाठी खूप महत्वाच्या असतात.
आषाढ नवरात्रीला गायत्री वा शाकंभरी नवरात्री असेही म्हणतात. आषाढा मध्ये (जून – जुलै) शुक्ल पक्षातील प्रतिपदेला
ह्या नवरात्रीचा आरंभ होतो. असे म्हणतात की आषाढात पाऊस पाणी भरपूर व्हावे म्हणून ही उपासना केली जाते. माघ नवरात्र हि माघ महिन्याच्या (जानेवारी-फेब्रुवारी) शुध्द प्रतिपदेला सुरु होते.
चौथी नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र. अश्र्विन महिन्याच्या शुध्द प्रतिपदेला देवीची स्थापना होते. यास घटस्थापना असेही म्हणतात. ह्याच दरम्यान शरद ऋतूची (थंडी) सुरवात होते. नऊ दिवस सर्व भक्त कडक उपवास करतात व देवीच्या नऊ रूपांची आराधना करतात. ही नऊ रूपे म्हणजे शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिध्दीदात्री ज्यांनी महिषासुराचा वध केला. ह्याच वेळी दक्षिण भारतात महालक्ष्मी आणि सरस्वती यांची पूजा केली जाते. संपूर्ण भारतात नवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.
Contact
Phone No. : 91+ 749 9846 591
Email: mrunal@vedikastrologer.comOffice Address
Address: Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.
Home Address
Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044
Blogs
Copyright © 2026 Vedik Astrologer | Powered by MI Tech Solutions






