लक्ष्मी पूजन कधी करायचे-2022
लक्ष्मी पूजन कधी करायचे? तर शास्त्रा प्रमाणे – अश्विन महिन्याच्या अमावस्येला तिथी (अमावस्या) जेंव्हा सूर्योदय पाहते त्यादिवशी, सूर्य तूळ राशीत असेल आणि चंद्र सुद्धा तूळ राशीत आणि स्वाती नक्षत्रातून भ्रमण करत असेल त्या वेळेत गोचर कुंडली बनवता स्थिर राशीचे लग्न असताना लक्ष्मी पूजन केले जाते.
सूर्य दर महिन्याच्या मध्यावर्ती पुढील राशीत भ्रमण सुरु करतो आणि चंद्र दर २.५ दिवसांनी पुढील राशीत जातो. दर महिन्याला जेंव्हा हे दोन्ही ग्रह एकाच राशीत एकत्र येतात तेंव्हा अमावस्या असते.
ह्या वर्षी चंद्र मास अश्विन मधील अमावस्या सुरु होत आहे इंग्रजी महिना ऑक्टोबरच्या २४ तारखेला सोमवारी संध्याकाळी ५:२८ ला आणि संपते २५ तारखेला मंगळवारी संध्याकाळी ४:१९ ला.
सूर्य १८ तारखे पासूनच तूळ राशीत आहे. चंद्र मात्र तूळ राशीत येत आहे २४ तारखेला सोमवारी रात्री ११:३३ पासून २६ तारखेच्या सकाळी ६:३१ पर्यंत तुळेत आहे आणि चंद्र स्वाती नक्षत्रात जात आहे २५ तारखेला दुपारी २:१७ ते २६ तारखेला दुपारी १:२४ मिन पर्यंत.
त्यामुळे शास्त्रानुसार लक्ष्मी पूजन हे २५ तारखेला मंगळवारी दुपारी २:१७ ते संध्याकाळी ४:१९ ह्या कालावधीत करायला पाहिजे. परंतु नेमके ह्या वर्षी २५ ऑक्टोबरला खंडग्रास सुर्यग्रहण असल्याने ह्या नियमांचे पालन करून लक्ष्मी पूजन करता येणार नाही.
सूर्यग्रहणाचे वेध मंगळवारी पहाटे ३:३० पासून लागत असून मंगळवारच्या सूर्यास्ता पर्यंत सूर्यग्रहण आहे. ह्या वेळेस संपूर्ण भारतात सूर्यास्त होण्याआधी ग्रहण मोक्ष होणार नाही, सूर्य ग्रस्तास्तच होणार आहे.
त्यामूळे ज्यादिवशी ग्रहण आहे त्यादिवशी लक्ष्मी पूजन होऊ शकत नाही. म्हणून लक्ष्मी पूजन हे २४ ऑक्टोबरला सोमवारी संध्याकाळी ५:२८ पासून करता येईल.
मुहूर्त मध्ये कुंडलीतील पहिल्या घराला लग्न असे नाव आहे. त्या घरात जेंव्हा स्थिर राशी असते त्या वेळेत प्रत्येक शुभ कार्याचा मुहूर्त काढला जातो. त्याच बरोबर अजून खोल अभ्यास करताना D-9 नवमांश कुंडलीची पण लग्न राशी पाहली जाते. दोन्ही कुंडलीत लग्न राशी जेंव्हा स्थिर स्वरूपाची असेल तो मुहूर्त उत्तम समजला जातो.
स्थिर राशी आहेत वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ. त्यापैकी गोचर कुंडलीत संध्याकाळी ५:२८ ते ५:३२ येवढा काळ मीन लग्न असेल. ०५:३२ ते ०७:१७ मेष लग्न तर ०७:१७ ते ०९:१७ वृषभ लग्न आहे जे स्थिर राशीचे म्हणून पूजेस जास्त लाभदायक समजले जाते. त्यानंतर रात्री ०९:१७ ते ११:३० मिथुन लग्न आहे.
गोचरीत वृषभ लग्न असताना स्थिर स्वरूपाची नवमांश लग्ने आहेत वृषभ २०:२७ ते २०:२९, सिंह २०:५६ ते २१:१०, वृश्चिक २१:३९ ते २१:५३ आणि कुंभ नवमांश २२:२२ ते २२:३७.
वरील माहिती आणि आपल्या सोइ नुसार यंदाचे लक्ष्मीपूजन आपण करू शकता.
नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान पहाटे ५:२०
हि दीपावली आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, ऐश्वर्या आणि आरोग्य घेऊन येवो हीच ईश्वरचरणी पार्थना !
* ह्या लेखातील सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार आहेत आणि दाते पंचांग प्रमाणे नोंदी केल्या आहेत.
Contact
Phone No. : 91+ 749 9846 591
Email: mrunal@vedikastrologer.comOffice Address
Address: Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.
Home Address
Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044
Blogs
Copyright © 2026 Vedik Astrologer | Powered by MI Tech Solutions






