Search for:

धनत्रयोदशी व लक्ष्मी पूजनातील भिन्नता

अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. ह्यालाच उत्तर भारतीय धनतेरस म्हणतात. ह्या वर्षी हा दिवस मंगळवारी २ नोव्हेंबरला सकाळी ११:३१ वाजता सुरु होऊन, बुधवारी ३ तारखेला सकाळी ९:०२ वाजता संपत आहे. धनत्रयोदशी हि लक्ष्मी पूजनाच्या २ दिवस आधी साजरी केली जाते.

 

लक्ष्मी पूजन हे अश्विन महिन्यातील अमावास्येच्या दिवशी ज्या वेळेत स्वाती नक्षत्रात चंद्र असतो तेंव्हा केली जाते. ह्या वर्षी लक्ष्मी पुजनाचा हा शुभ मुहूर्त (अमावस्या+स्वाती नक्षत्र) ४ नोव्हेंबरला सकाळी ७:४२ वाजल्या पासून ५ नोव्हेंबरच्या पहाटे २:४४ पर्यंत आहे. लक्ष्मी पूजन हे नेहमी स्थिर राशी च्या मुहूर्तावर केले जाते ज्यामुळे घरातील लक्ष्मी (धन) खर्च न होता घरात स्थिर राहिल. जरी दिवस भर मुहूर्त असला तरी प्रत्येकाने स्वतःच्या पत्रिकेला साजेश्या मुहूर्तावरच पूजा करावी.

 

वैयक्तिक मुहूर्तासाठी कॉल करा: 74998 46591


धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजन ह्यात फरक आहे. समुद्र मंथनातून जेंव्हा साक्षात विष्णू एका हातात अमृत कलश व दुसऱ्या हातात आयुर्वेदाचे पुस्तक हाती घेऊन धन्वंतरी रूपाने प्रकट झाले तो दिवस साजरा करण्यासाठी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतो. धन्वंतरीची पूजा केल्याने स्वतःला व परिवाराला उत्तम आरोग्य प्राप्त होते ज्यामुळे साहाजिकच आपण समृद्धीच्या मार्गी चालू लागतो. त्याच दिवशी देवांचे कोषाध्यक्ष, लक्ष्मी-कुबेर जे भौतिक संपत्ति आणि समृद्धि ह्याचे प्रतीक आहेत, त्यांची सुद्धा पूजा केली जाते.


लक्ष्मी पूजाही धन, धान्य, संपत्ती व सुख वृद्धिंगत व्हावी म्हणून केली जाते. असा म्हणतात की जे घर एकदम स्वच्छ असेल, दिव्यांनी उजळून निघालं असेल, सुंदर रांगोळीने सजवलेले असेल त्याच घरात लक्ष्मी प्रवेश करते. म्हणूनच परंपरेने दिवाळीच्या आधी घराला रंगरंगोटी करून साफसफाई करणे, पणत्या लावून, रांगोळी काढून घर सजवण्याची पद्धत आहे.


तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn