Search for:

हळदी - कुंकू

कोणताही सण, विधी किंवा उत्सव असो, हळदी-कुंकू हा सर्व हिंदू प्रथांचा अविभाज्य घटक आहे. हे लाल पिवळे रंग कपाळावर, भुवयांच्या दरम्यान लहान गोलाकार टिळ्या प्रमाणे लावले जातात. प्रत्येकाचे स्वतःचे महत्त्व आणि गुणधर्म आहेत, चला त्याबद्दल जाणून घेऊया.


आयुर्वेदात, हळदीचा उपयोग वैद्यकीय आणि सौंदर्य प्रसाधने या दोन्ही गुणधर्मांसाठी केला जातो. प्रामुख्याने, हे प्रथमोपचारा मध्ये जास्त करून जंतुनाशक म्हणून वापरले जाते. हे रक्तस्त्राव थांबवते आणि संक्रमणास प्रतिबंध करते. बाळ-बाळंतिणीला रोज अंघोळीच्या वेळी हळद लावली जाते, हळदीचे दूध आजारी व्यक्तींसाठी विहित केलेले आहे कारण ते ऊर्जा पुनर्प्राप्तीमध्ये उत्प्रेरक भूमिका बजावते. चेहऱ्यावर लेप लावल्याने त्वचा चमकदार आणि नितळ दिसते, मुरुम कमी होतात.


लग्नापूर्वी हळदी समारंभ असतो. हे वधू वराच्या शुद्धीकरणाचे प्रतीक आहे, नवीन फलदायी जीवन सुरू करण्यासाठी त्यांचे पाप धुवून, मुलीपासून स्त्रीमध्ये रूपांतरित होते आणि मुलाचे एका प्रौढ पुरुषा मध्ये. कुटुंबीय नवरानावरीच्या पायावर, हातावर आणि चेहऱ्यावर भरपूर हळद लावतात आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतात. यासारख्या अनेक हिंदू समारंभांमध्ये हळदीला महत्त्वाची भूमिका असते.


हळदी सोबत कुंकू, हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करणारा लाल रंग आहे. हे पुरुष आणि स्त्रिया आणि लहान मुली देखील लावतात, फरक एवढाच आहे की पुरुष ते उभ्या किंवा गोल टिळ्या प्रमाणे लावतात. विवाहित स्त्रिया, वर्तुळाकार तिलकासह, कपाळावर केसां भांगेमध्ये कुंकु लावतात. याला ऊत्तर भारतात सिंदूर असे म्हणतात आणि ते तिच्या सुवासिनी/सौभाग्यवती (विवाहित स्त्री) असण्याचे प्रतीक मानले जाते. कुंकू एखाद्या व्यक्तीच्या उर्जा आणि सामर्थ्याशी संबंधित आहे, मन विचलित असेल तर शांतता आणि स्थैर्य मिळवायला मदत करते.


महिला हळदी-कुंकू नावाचा कार्यक्रम साजरा करतात. हा भारतातील एक सामाजिक मेळावा आहे ज्यामध्ये विवाहित महिला त्यांच्या विवाहित स्थितीचे प्रतीक म्हणून हळद आणि कुंकू यांची देवाण-घेवाण करतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. मकर संक्रांती, नवरात्री, चैत्र मास, श्रावण मास, गौरी-गणपती, तुळशी विवाह इत्यादी बहुतेक सणासुदीच्या दिवशी हळदी-कुंकु साजरी केली जाते. तिचा उगम मैत्री आणि स्त्रीत्वाचा उत्सव याला प्रोत्साहन देण्याचे साधन म्हणून आढळतो कारण जुन्या काळात स्त्रीवरती अनेक बंधने होती.


पूजे मध्ये कलश सजवण्यासाठी, पूजेची थाळी सजवण्यासाठी, रांगोळी मध्ये, लक्ष्मीची पाऊले उमटवणे असो किंवा औक्षण किंवा नवीन वस्तूंचे स्वागत असो किंवा उत्सवाशी संबंधित इतर अनेक गोष्टींमध्ये देखील याचा वापर केला जातो. हळदी कुंकुची उपस्थिती आपल्या मनाला नेहमीच शुभ संकेत देते.

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn