पूजेत सुपारीचे महत्व
जेव्हा आपण कुठली पूजा, हवन, मंगल कार्य किंवा पारंपारिक विधी करतो, तेव्हा पूजेच्या साहित्यात हळदी-कुंकू नंतरचे स्थान हे सुपारी चे असते. तुम्ही कधी विचार केला आहे का कि देवपूजेत सुपारीला इतकं महत्व का दिलं गेलंय? सुपारीचे गुण, उत्पत्ती आणि उपयोग यांबद्दल आपण प्रस्तुत ब्लॉग मध्ये माहिती जाणून घेऊया.
सुपारीला संस्कुत भाषेत ‘पूगीफल’ आणि इंग्रजीत ‘बीटल’ किंवा ‘ऐरेका नट’ असे म्हणतात आणि हि पूजेत आणि दैनिक जीवनात एक महत्वाची वस्तू आहे. सुपारी हे ‘ऐरेका पाम’ नावाच्या झाडाचे फळ आहे, जे गोलाकार, पांढऱ्या रंगाचे आणि काष्ठमय पोत असलेले, तोडायला कठीण आणि तुरट चव असणारे असे फळ आहे.
सुपारीच्या विशेष गुणांमुळे याचे स्थान सगळ्या फळांमध्ये सर्वोत्तम आहे. सुपारीच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’ असे म्हणतात, म्हणजेच असे झाड ज्याच्या सगळ्या अंगांचा उपयोग केला जातो आणि काहीही वाया जात नाही.
या फळाच्या टणकपणाचे कारण त्याचे रासायनिक बंधन आहे, याच्या अणु चे बंधन अतिशय मजबूत असते. सुपारीला ‘वर्षायु फळ’ असेही म्हंटले जाते कारण याला तयार होण्यासाठी पूर्ण एक वर्ष लागतो, याचमुळे तिन्ही ऋतु आपले संस्कार या फळाला देतात. असे म्हंटले जाते कि या फळाच्या बळामुळे हे तीनही ऋतुत टिकून राहते, जे निष्ठा, प्रतिबद्धता, दृढ संबंध आणि उपयोगिता दर्शवते.
सुपारीच्या उत्पत्तीचा काळ आणि धार्मिक कार्यात याचा वापर कधी पासून सुरु झाला हे अस्पष्ट आहे पण आयुर्वेदात काही संदर्भ सापडले आहेत. आयुर्वेदात असे सांगितले आहे कि सुपारीची तुरट चव कफ नाशक असते, परंतु जर अधिक प्रमाणात याचे सेवन केले गेले तर वात दोष वाढू शकतो. सुपारीत अधिक मात्रेत फाइबार असते जे कोलेस्ट्रोल (पित्त-सांद्रव) ला कमी करण्यात आणि कैल्शियम ला नियमित ठेवण्यात मदत करते. सुपारी चा वापर मुखशुद्धी साठी देखील केला जातो, एक छोटा तुकडा खाल्ल्याने पाचनक्रिया सुधारते आणि अधिक लाळ कमी होते.
हिंदू शास्त्रात सुपारीला दैवी स्थान प्राप्त आहे; याला गणपतीचे प्रतीकात्मक रूप मानले जाते. जर कुठल्या धार्मिक कार्यात बायको उपस्थित नसेल तर त्या जागी सुपारी ठेवली जाते. खाण्याची सुपारी आणि पूजेत वापरली जाणारी सुपारी या दोन वेगळ्या वस्तू आहेत. खाण्याची सुपारी मोठी आणि गोल असते, पण पूजेत वापरली जाणारी सुपारी छोटी आणि शीर्षावर शिखर या आकाराची असते. मला असं वाटतं कि, नारळाला पूजनीय स्थान असून सुद्धा, सुपारीच्या छोट्या आकारामुळे पूजेत सुपारीचा वापर केला जातो ज्यामुळे पूजेला व्यवस्थित रूप प्राप्त होते.
आपण असे म्हणू शकतो कि सुपारीच्या या सगळ्या विशेष गुणांमुळे याला दैवत्व प्राप्त झाले आहे. पूजेनुसार किंवा कार्यानुसार वापरल्या जाणाऱ्या सुपारीची संख्या बदलते परंतु त्याचे महत्व कधीच बदलत नाही.
Contact
Phone No. : 91+ 749 9846 591
Email: mrunal@vedikastrologer.comOffice Address
Address: Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.
Home Address
Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044
Blogs
Copyright © 2026 Vedik Astrologer | Powered by MI Tech Solutions






