Search for:

गणपतीची सोंड कुठल्या दिशेला असावी?

घरात किंवा ऑफिस मध्ये नेहमी डाव्या सोंडेचा गणपती बसवावा (गणपतीच्या सोंडेचे टोक त्याच्या डाव्या हाताकडे वाळलेले असावी).

 

गणेशोत्सवासाठी असो किंवा देव्हाऱ्यात ठेवण्यासाठी असो किंवा घर सजवण्यासाठी पेटिंग अथवा म्युरल म्हणून असो, गणपतीच्या रूपा बरोबरच त्याची सोंड पाहून त्याची निवड करावी. मग नक्की सोंड कोणत्या बाजूस असावी बरे….
गणपतीची सोंड हि त्याच्या उजव्या हाता कडे वळलेली किंवा डाव्या हाता कडे वळलेली किंवा कोणत्या हि बाजूस न वळता सरळ पोटाकडे दुमडलेले किंवा बाहेरच्या बाजूस आलेली सुद्धा असते.

 

आपल्या मानवी शरीरातील ऊर्जा हि ३ भागांमध्ये विभागली आहे आणि नाडीच्या ३ प्रकारांचा ह्या उर्जेवर अंमल आहे. नाडी म्हणजे नस नव्हे.


शरीराची डावी बाजू इडा नाडीच्या अमला खाली येते आणि इदा नाडी वर चंद्राचे वर्चस्वासव आहे. त्यामुळे त्याला स्त्रीत्वा सामान मृदू, सौम्य, शीतलता लाभली आहे. मानवास मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, सुख आणि यश प्राप्त होते. ज्या गणपतीच्या मुर्तीचे सोंडेचे टोक त्याच्या डाव्या हाता कडे वळलेले असते त्याला विधी व रुढींचे कडक नियम नसतात. त्यामुळे गणेशोत्सवातच नाही तर एरवी सुद्धा घरात किंवा ऑफिस मध्ये त्याची स्थापना करून त्याची पूजा व आराधना करणे सामान्य जनतेस सोप्पे होते. ह्या प्रकारास बालरूपी गणेश हि म्हणतात.

 

शरीरातील उजव्या बाजूची ऊर्जा हि पिंगळा नाडीच्या अमलाखाली येते. ह्या ऊर्जेचे स्रोत साक्षात सूर्य असल्याने अग्नी तत्वचा अनुभव आपल्याला येथे जाणवतो. एखाद्या पुरुषा प्रमाणेच कडक शिस्त, रुद्रावतार, दाह जाणवतो. ह्या अश्या उग्र रुपी गणेशाला, ज्याच्या सोंडेचे टोक त्याच्या उजव्या हाता कडे वाळलेले असते, त्याला प्रार्थने मध्ये भक्ती, एकाग्रता, प्रामाणिकता लागते. विधीं मध्ये कडक शिस्त व नियम पाळावे लागतात. जे सगळ्या कुटुंबाने पाळणे गरजेचे असते.

 

तिसरा प्रकार जेथे गणपतीची सोंड हि उजव्या किंवा डाव्या बाजूस न वळता सरळ रेषेत असते व त्याचे टोक बाहेरच्या बाजूस (ऊर्ध्व मुखी) असते किंवा पोटा कडे आत वळलेली असते. ऊर्ध्व मुखी सोंडेचा गणपती खुपच दुर्मिळ आहे. त्याचे हे रूप बुद्धी वर्धक मानले जाते. शरीरातील मध्यभागातील हि ऊर्जा सुष्मना नाडी मध्ये येते. हि नाडी सर्वच बाबतीत समतोल मानली जाते त्यामुळे ह्या प्रकारास शुभत्व प्राप्त झाले आहे.
गणेशाची मूर्ती निवडताना चेहऱ्यावरचे भाव आणि सोंडेची दिशा तर आपण बघतोच त्या बरोबर शक्यतो पद्मासनात बसलेला निवडावा. सुखासनात (लवंडलेला) किंवा उभा गणपती हा निवांत किंवा घाईत वाटतो पण पद्मासनातला गणपती हा एकाग्रह व स्थिर असतो, त्याला जायची घाई नसते.

 

चला तर आता तुमच्या आराधनेच्या क्षमतेनुसार आणि आवडी नुसार लवकर गणपती बाप्पाला घरी घेऊन या….

 

ll गणपती बाप्पा मोरया ll

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn