Search for:

भाग ८ – नाडी कूट (गुण मिलन)

अष्टकूट मध्ये नाडी कूट अंतिम आणि एक अतिशय महत्वपूर्ण कूट आहे. अष्टकूटाच्या एकूण 36 गुणांमध्ये प्रत्येक कूटाला जे जास्तीत जास्त अंक मिळतात ते ह्या प्रमाणे: वर्ण कूट – 1, वश्य कूट – 2, तारा कूट – 3, योनी कूट – 4, ग्रह मैत्री कूट – 5, गण कूट – 6, राशी कूट – 7 आणि नाडी कूट – 8.

नाडी मुख्यतः वैवाहिक जीवनाची सफलता आणि येणारी संतान दर्शविते. आपल्या जीवनातील ह्याचा महत्व आणि प्रभाव जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्र हे सर्वोत्तम माध्यम आहे.

नाडी चे तीन प्रकार आहेत – आद्य नाडी, मध्य नाडी आणि अंत्य नाडी. संपूर्ण 27 नक्षत्रांचे विभाजन ह्या तीन प्रकारच्या नाडींमध्ये केले जाते ज्याच्याने एका नाडी मध्ये 9 नक्षत्र समाविष्ट होतात. अशाप्रकारे सगळ्या 27 नाक्षत्रांमधील 9 नक्षत्र आद्य नाडीत, 9 नक्षत्र मध्य नाडीत आणि 9 नक्षत्र अंत्या नाडीत येतात. आद्य नाडी वात प्रकृती, मध्य नाडी पित्त प्रकृती आणि अंत्य नाडी कफ प्रकृती दर्शविते.

नक्षत्रांचे गुण, विशेषता आणि जैविक स्वरूप ह्यांवरून वरील तीन प्रकारच्या नाड्या प्राप्त केल्या आहेत आणि प्रत्येक नाडी शरीरातील 3 द्रव पदार्थांशी, ज्यांना त्रिदोष (वात/कफ/पित्त) असेही म्हणतात, संबंधित आहे. प्रत्येक मानवी शरीरात हे तीन द्रव पदार्थ सापडतात पण एका पदार्थाचा प्रभाव बाकी दोन पेक्षा अधिक असतो. नक्षत्रांचा मेळ आणि त्रिदोष संतुलन मनुष्याच्या शारीरिक स्वास्थ्य आणि स्वभावाला परिभाषित करतात. ह्याच्या आधारावर आपल्या ॠषींनी, वंशावलीचा अभ्यास करून संतानाच्या स्वास्थ्याचे मुख्य घटक रचित केले.

व्यक्तीच्या नाडीचा प्रकार त्याच्या जन्मकुंडलीतील चंद्र ज्या नक्षत्रात स्थित आहे त्या नक्षत्रावर अवलंबून असते. नाडी कूटात लग्नाची अनुकुलता मिळवण्यासाठी एकाच नियम आहे, तो म्हणजे वर आणि वधू ची नाडी एकसारखी असू नये, जसे आद्य – आद्य, मध्य – मध्य किंवा अंत्य – अंत्य. ह्या कूटात अंक प्राप्त करण्यासाठी वर आणि वधू ची नाडी वेगळी असणे आवश्यक आहे.
जर वर आणि वधू ची नाडी एकसारखी असेल तर एक-नाडी दोष उत्पन्न होतो. एक-नाडी दोष निवारणेसाठी काही उपाय सूचित केले आहेत. जर वर आणि वधू चा नक्षत्र एक असेल पण त्यांचे नक्षत्र पद (चरण) किंवा राशी वेगळ्या असतील, किंवा एक रास पण भिन्न नक्षत्र असतील तर हा दोघ लागू होत नाही.

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn