Search for:
Rakshabandhan

Rakshabandhan[marathi]

Rakshabandhan

रक्षाबंधन

येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल: ।
तेन त्वाम् अभिबद्धनामि रक्षे मा चल मा चल॥


हा मंत्र राखी बांधताना म्हणावयाचा आहे. यंदाचे रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा 11 ऑगस्ट, गुरुवारी येत आहे.


ह्याचा अर्थ असा घेता येईल कि ज्या रक्षा सूत्राने दानवांच्या महापराक्रमी राजा बळीला धर्माशी बांधलं गेलं, त्याच रक्षा सूत्राने मी तुला बांधते म्हणजेच धर्म पालन करण्यासाठी मी तुला वचनबद्ध करते.


रक्षाबंधन हा भाव-बहिणींचा सण म्हणून प्रसिद्ध आहे, सख्खे नाहीतर नात्यातले भाऊ-बहीण किंवा काही वेळेस स्त्री एका पुरुषाला राखी बांधून त्याला आपला भाऊ मानते (मानलेला भाऊ). परंतु इतिहासात अशी काही उदाहरणे आहेत जिथे बायको नवऱ्याला, मैत्रीण मित्राला रक्षणासाठी राखी बांधतानाची बांधते.


ज्या पैकी एक आहे इंद्र आणि शची (इंद्राणी). हिंदू पौराणिक कथांमध्ये असे मानले जाते की पहिली राखी भावाला नव्हे तर पतीला बांधली जाते. देव आणि दानवांच्या युद्धादरम्यान इंद्राची पत्नी सचीने भगवान श्रीकृष्णाचा सल्ला घेतला. त्याने तिला भगवान इंद्राच्या मनगटा भोवती बांधण्यासाठी एक पवित्र सुती धागा दिला आणि सर्व संकटांपासून त्याचे रक्षण केले.


महाभारतानुसार, एकदा भगवान श्रीकृष्णाचे बोट कापले. हे पाहून द्रौपदीने ताबडतोब तिच्या साडीतून कापडाचा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला. आपल्या मैत्रिणीच्या ममत्वाने भारावलेल्या सख्याने तिचे संरक्षण करण्याचे वचन तिला दिले. आपल्या सर्वांना माहीत आहे की, राजा धृतराष्ट्राच्या दरबारात जेव्हा दुःशासनाने तिचे चीर हरण केले तेव्हा श्रीकृष्णाने त्याचे वचन पूर्ण केले.


विष्णु पुराणानुसार, भगवान विष्णूचा भक्त असलेल्या बळीने त्याच्याकडे संरक्षण मागितले. भगवान विष्णूंनी त्यांची विनंती मान्य केली आणि द्वारपालाच्या वेशात त्यांच्यासोबत राहिले. आपल्या पतीची वाट पाहणारी देवी लक्ष्मी, बळी राजाकडे गेली आणि तिने पवित्र श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी त्याच्या मनगटावर रंगीत सुती धागा बांधला आणि संरक्षण आणि आनंदाच्या शुभेच्छा दिल्या. तेंव्हा बळी राजाने तिची इच्छा पूर्ण करण्याचे वाचन दिले. तेंव्हा तिने आपल्या पतीला त्याच्या वचनातून मुक्त करण्याची विनंती केली आणि त्याने आपल्या बहिणीला, देवी लक्ष्मीला दिलेल्या वाचनाचे पालन केले.


ह्याच प्रमाणे अजूनही अनेक कथा आहेत जसा कि, अलेक्झांडरची पत्नी रुकसानाने पुरु राजाला राखी पाठवून आपल्या पतीस इजा न करण्याची विनंती केली. चित्तोडच्या राणा सांगाची विधवा राणी कर्णावतीने सम्राट हुमायूला राखी पाठवून गुजरातचा सुलतान बहादूर शाह याच्या आक्रमणापासून रक्षणासाठी धावा केला होता. शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजित सिंग यांच्या पत्नी महाराणी जिंदन यांनी नेपाळच्या शासकाला राखी पाठवली. जेव्हा शीख साम्राज्य ब्रिटीशांनी जिंकले तेव्हा नेपाळच्या जंग बहादूरने तिला आश्रय दिला आणि तिला संरक्षण दिले.


ह्या सर्व कथांचा अर्थ हा कि श्रावणाच्या शुद्ध पौर्णिमेला बांधल्या जाणाऱ्या ह्या पवित्र धाग्याचे सामर्थ्य सिद्ध आहे, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती कडे रक्षणासाठी मागितलेले वाचन आणि दुसर्याने त्याचे पालन करणे होय.

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

Rakshabandhan

Rakshabandhan[Hindi]

Rakshabandhan

रक्षाबंधन

येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल: ।
तेन त्वाम् अभिबद्धनामि रक्षे मा चल मा चल॥


इस मंत्र का उच्चारण रक्षाबंधन विधि के समय किया जाता है। इस वर्ष रक्षाबंधन ११ अगस्त, गुरुवार के दिन मनाया जायेगा।


इसका अर्थ हम कुछ इस प्रकार ले सकते हैं कि “जिस रक्षा सूत्र से दानवराज महाबली को धर्मचक्र से बांधा गया, उसी रक्षा सूत्र से मैं तुम्हे धर्म पालन के लिए वचनबद्ध करती हूँ।”


रक्षाबंधन का त्यौहार भाई-बहन के रिश्ते की प्रशंसा में मनाया जाता है। सगे नहीं तो विस्तृत परिवार, याने चचेरे, ममेरे, मौसेरे बंधुओं को, या मुंहबोले भाईओं को राखी बाँधी जाती है। परंतु इतिहास कुछ ऐसे भी उदहारण देता है जहाँ यह सूत्र पत्नी पति को या सखी मित्र को बांधती हो।


उनमें से एक है इंद्र और शची (इन्द्राणी)। पुराणों के हिसाब से पहली राखी भाई को नहीं बल्कि पति को बाँधी जाती है। देव-असुर युद्ध के दौरान शची ने कृष्ण से अपने पति की सुरक्षा हेतु सलाह मांगी। उन्होंने शची को इंद्रा की कलाई पर बाँधने के लिए एक पवित्र सूत्र दिया जो सदैव उन्हें संकटों से दूर रखेगा।


महाभारतानुसार, जब कृष्ण की अंगुली पर छोटी लगी तब द्रौपदी ने तुरंत अपने वस्त्र से टुकड़ा फाड़ कर जख्म पर बाँधी। अपनी सखी के ममताभाव से प्रभावित होकर श्रीकृष्ण ने उन्हें संरक्षण का वचन दिया। हम सभी जानते हैं, जब धृतराष्ट्र के दरबार में दुःशासन ने क्रूरता से द्रौपदी का चीरहरण करने की कोशिश की तब कृष्ण ने अपना वचन पूरा किया।


विष्णु पुराण नुसार, भगवन विष्णु के भक्त दानवराज बलि ने उनका संरक्षण चाहा। विष्णु ने उसकी प्रार्थना सुनी और द्वारपाल के वेश में उसके साथ रहे। अपने पति की राह देखती लक्ष्मीदेवी आखिर बलिराज के पास गईं और श्रवण के पावन महीने में उसे रंगीला सूत्र बाँध सुरक्षा का वचन और शुभकामनाएँ दीं। तब राजा ने उनकी इच्छा पूरी करने का वचन दिया, और यूँ वह श्री विष्णु को बंधनमुक्त कर वैकुंठ लौट गईं।


कुछ ऐसे ही सिकंदर की रानी रुखसाना ने राजा पुरु को राखी भेज अपने शौहर को हानि न पहुंचने का अनुरोध किया। चित्तोड़ के राणा सांगा की विधवा रानी कर्णावती ने हुमायुँ राखी भेज बहादुर शाह के हमले से बचाव की याचना की थी। सिख साम्राज्य के संस्थापक महाराजा रणजीत सिंग की पत्नि महारानी जिंदन ने नेपाल के शासक को राखी भेजी थी। जब उनका राज्य अंग्रेज़ों की चपेट में आ गया तब जंग बहादुर ने उन्हें नेपाल में आश्रय दिया था।


इन किस्से-कहानियों का तात्पर्य यह कि श्रावण की शुद्ध पौर्णिमा के अवसर पर बंधा जाने वाले इस धागे का सामर्थ्य सिद्ध है, एक व्यक्ति ने सुरक्षा का वचन माँगना और दूसरे ने उस वचन को निभाना।

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

oti bharan

Oti Bharan Marathi

oti bharan

ओटी भरणा

श्रावण महिना आला की सुवासिनीचे विशेष कार्यक्रम सुरु होतात. त्यामध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे एका सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनींनी ओटी भरणे. हिंदू धर्मात त्यातही विशेषतः महाराष्ट्रात ह्याला खूप महत्व दिले जाते. लग्न समारंभ, आठंगुळ, डोहाळे-जेवण, बारसं असो किंवा सासरी जाणारी लेक असो व सणा-सुदीला बोलावलेली सवाष्ण असो, ह्यातील प्रत्येक वेळी त्या लग्न झालेल्या बाईची म्हणजेच सुवासिनीची ओटी भरली जाते.


ओटी भरण्या मागचे मुख्य उद्देश म्हणजे एका सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनीला संतती सुखासाठी दिलेल्या शुभेच्छा. ओटी म्हणजे बेंबीच्या खालचा पोटाचा भाग, जेथे गर्भाशय असते/गर्भ वाढतो. ओटी देताना सुवासिनी आपल्या पदरामध्ये ओटीचे सामान धरून तेच ती दुसऱ्या सुवासिनीच्या पदरात/ओच्यात/दुपट्ट्यामध्ये सोडते आणि वरून ३ किंवा ५ वेळा ओंजळीने तिच्या पदरात तांदूळ घालते. ओटी भरणारी स्त्री दुसऱ्या स्त्रीला नवनिर्मितीचे/वंशवृद्धेचे सामर्थ्य प्रदान करते व आशीर्वाद देते, तिची कूस उजावी, फुलावी, मातृत्वाचा लाभ व्हावा यासाठीचे अभिष्ठचिंतन म्हणजे ओटी भरण. कुमारिकेची किंवा विधवा स्त्रीची ओटी भरली जात नाही.


ह्या ओटी भरण्याच्या विधी मध्ये हळदी-कुंकवा सोबत तांदूळ, नारळ, सुपारी आणि तांबुल पत्र (विड्याची पाने) आणि गजरा/फुलं हे मुख्य साहित्य होय. त्या मध्ये काही वेळेस फळे आणि नाणी किंवा पाकिटात पैसे घालून पण देतात.


ओटी भरताना आधी करंगळी शेजारील बोट व अंगठ्याच्या साहायाने हळदी-कुंकू सुवासिनीच्या कपाळावर लावले जाते. हळदी-कुंकू हे त्या स्त्रीचे विवाहिततेचे प्रतीक असून तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना स्वरूप मानून लावले जाते. ओटी मध्ये वापरले जाणारे धान्या – तांदूळ हे पावित्र्य, सुपीकता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.


ओटीतील सुपारी हि तितकीच महत्वाची. सुपारीला ‘वर्षायु फळ’असेही म्हंटले जाते, कारण याला तयार होण्यासाठी पूर्ण एक वर्ष लागतो, ह्याचमुळे तीनही ऋतु आपले संस्कार या फळाला देतात. असे म्हंटले जाते की ह्या फळाच्या बळामुळे हे तीनही ऋतुत टिकून राहते, जे निष्ठा, प्रतिबद्धता, दृढ संबंध आणि उपयोगिता दर्शवते. ओटीमध्ये सुपारी अखंडतेचे प्रतीक दर्शवते.


सुपारी सोबत ओटीत न सोललेला नारळ (असोल्या) हि घातला जातो. नारळाला श्रीफळ हि म्हणतात. नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’असे म्हणतात, म्हणजेच असे झाड ज्याच्या सगळ्या अंगांचा उपयोग केला जातो आणि काहीही वाया जात नाही. वरून टणक आणि आतून एकदम मऊ ओलसर खोबरं आणि पाणी हा चमत्कार निसर्गाचं दाखवू शकतो. हा पाण्याने भरलेला नारळ सशक्त गर्भाचे प्रतीक म्हणून ओटीत घातला जातो.


सुपारी आणि नारळ हे दोन्ही दोन तांबूल पत्रांवरती ठेऊन ओटीत घातले जाते. तांबूल पत्र म्हणजेच विड्याची पाने. विड्याची पाने वापरण्या मागे त्याची त्रिदोषांवर मात करायची रासायनिक शक्ती आहे. वात-पित्त-कफ ह्यांवर गुणकारी ठरणारे हे विड्याची पान त्या स्त्रीच्या उत्तम आरोग्याच्या उद्देशाने ओटीत घातले जाते.


ह्याशिवाय काही जण केळी किंवा सफरचंद, पेरू सारखी इतर फळे हि ओटीत घालतात. कुठलही फळ हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे. झाडाला फळ येणे ह्याचा संबंध स्त्रीच्या पोटी मूल होण्याशी सुद्धा जोडला जातो, म्हणून ओटीत फळ घालून तिला हि तिच्या वात्सल्याचे फळ मिळूदेत अशी कामना केली जाते. त्याबरोबर गजरा किंवा फुलं हे सुगंधाने त्या सुवासिनीचे मन प्रसन्न करण्यासाठी दिले जाते.


ओटी भरताना नाणे किंवा पैसे घालण्याची प्रथा अलीकडे सुरु झाली आहे. पूर्वी ओटी मध्ये वस्त्र स्वरूप म्हणून खण (ब्लाउज पीस) दिला जायचा, त्यामुळे “खणा-नारळाने ओटी भर” असे म्हणले जायचे. पण आजच्या मॅचिंगच्या काळात त्याचा विशेष वापर होत नाही, म्हणून त्याची जागा पाकिटातील पैशांनी घेतली आहे एवढेच.


ह्या विधीला जास्त महत्व स्त्रीच्या आयुष्यात ऋतू मास चालू असे पर्यंत (मासिक पाळी) आहे, त्यानंतरही तिची ओटी भरली जाते, परंतु ओटी भरण्याचा मुख्य उद्देश हा नवं सुवासिनीस संतती सुखाचा आशीर्वाद असा आहे. ओटी देणारी आणि घेणाऱ्या दोन्ही स्त्रिया ह्या विवाहित असाव्या लागतात.


शास्त्रात असा उल्लेख आहे कि, एक स्त्री आपल्या आईची ओटी फक्त अधिक महिन्यातच भरू शकते. एरवी सासरी निघालेल्या मुलीची ओटी आई भरते पण अधिकमासात आईची ओटी भरून पुन्हा तुझ्याच पोटी जन्म मिळूदे म्हणून आशीर्वाद मागते अशी प्रथा आहे. पण सासूची ओटी तिने कधीच भरायची नसते. कारण लग्न झाल्यावर त्या माउलीने सुनेची ओटी भरून आपल्या कुशीतील फळ तिच्या स्वाधीन केलेले असते, त्यामुळे सून पुन्हा सासूला ते फळ परत नाही देऊ शकत.

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

Uttarayan and Dakshinayan

उत्तरायण और दक्षिणायन [Hindi]

Uttarayan and Dakshinayan

उत्तरायण और दक्षिणायन

हम जानते हैं की साल में दो संक्रान्तियाँ या अयनांत होते हैं, जो पूर्व-पश्चिम दिशात्मक अक्ष पर पृथ्वी की गति दर्शाते हैं। सूर्य की एक परिक्रमा करने के लिए हमें एक वर्ष लगता है, अर्थात पूर्व-पश्चिम व् पश्चिम-पूर्व। हमारी स्थिति के कारण लगता है कि सूर्य पृथ्वी की परिक्रमा कर रहा है। इसलिए दिसंबर-जून (ग्रीष्म संक्रांति) के दौरान सूर्य दक्षिण से उत्तर और जून-दिसंबर (शीत संक्रांति) में उत्तर से दक्षिण कि ओर स्थानांतर करता है।

 

ग्रीष्म संक्रांति को हम उत्तरायण के नाम से जानते हैं। यह २२ दिसंबर के आस-पास शुरू होकर अगले ६ महीने तक जारी रहता है। हम इस वक़्त शिशिर ऋतु, बसंत एवं गर्मी के उत्तरार्ध का आनंद उठाते हैं। उत्तरायण सकारात्मकता का प्रतीक है और इस कालावधि में शुभ कार्य प्रोत्साहित किये जाते हैं। उत्तरायण में दिन की अवधि रात्रि से अधिक होती है।


दक्षिणायन यह नाम शीतकालीन संक्रांति को दिया गया है, और इसकी शुरुआत २२ जून के करीब होती है। दिन के समय में नमूदार परिवर्तन नज़र आता है: रात के समय ज्यादा होता है। प्रारंभिक दिनों में हम वर्षा ऋतु का आनंद लेते हैं और उसके पश्चात् शरद ऋतु व शिशिर ऋतु की शुरुआत का अनुभव लेते हैं। दक्षिणायन नकारात्मक ऊर्जा से जोड़ा जाता है जिसकी वजह से इस काल में शुभ कार्य या विधि करना प्रोत्साहित नही किया जाता।


उत्तरायण को हिन्दू धर्म में मकर संक्रांति के उत्सव द्वारा मनाया जाता है जो वास्तविक उत्तरायण गति के काफी नज़दीक पड़ती है। पुराणों में उत्तरायण के पावित्र्य के अनेक दृष्टांत हैं- गंगा माँ ने पृथ्वी पर इसी दिन प्रवेश किया था यह मान्यता है; भीष्म पितामह ने बलिदान देने हेतु उत्तरायण की प्रतीक्षा की थी।


माघ स्नान की विधि में पवित्र नदियों में स्नान करने की सलाह दी गयी है, और यह कार्य उत्तरायण के दौरान ही संपन्न किया जाता है। इसके पीछे यह समझ है कि गर्मी का मौसम स्वच्छ आकाश और देवज्ञान अपने साथ लाता है। कुछ इसी प्रकार, दक्षिणायन का धूमिल आसमान रात से संबंधित है। साधना की दृष्टी से उत्तरायण ज्ञानप्राप्ति के लिए और दक्षिणायन शुद्धिकरण के लिए उचित है।


इस वर्ष उत्तरायण समाप्त होकर १६ जुलाई २०२२, शनिवार के दिन दक्षिणायन का प्रारंभ होगा।

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

उत्तरायण आणि दक्षिणायन [Marathi]

Uttarayan and Dakshinayan

उत्तरायण आणि दक्षिणायन

आपल्याला माहित आहे की एका वर्षात दोन संक्रांती किंवा अयनांत असतात, जे पूर्व-पश्चिम दिशात्मक अक्षावर पृथ्वीची हालचाल दर्शवतात. सूर्याभोवती एक वर्तुळाकार प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक वर्ष लागते, म्हणजे पूर्व-पश्चिम आणि पश्चिम-पूर्व. आपल्या स्थितीमुळे, आपल्याला सूर्य आपल्याभोवती फिरताना दिसतो. म्हणून, डिसेंबर-जून (उन्हाळी संक्रांती) दरम्यान सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि जून-डिसेंबर (हिवाळी संक्रांती) दरम्यान उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत असल्याचे आपण पाहतो.


उन्हाळी संक्रांतीला उत्तरायण असेही म्हणतात. हे 22 डिसेंबरच्या आसपास सुरू होते आणि 6 महिने चालु रहाते. आपण या वेळी हिवाळा, वसंत ऋतु आणि उन्हाळ्याच्या उत्तरार्धाचा अनुभव घेतो. उत्तरायण हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि या कालावधीत शुभ कार्ये करण्यास प्रोत्साहित केले जाते. उन्हाळ्यातील संक्रांतीत दिवस रात्रींपेक्षा मोठे असतात.


दक्षिणायन हे हिवाळ्यातील संक्रांतीचे नाव आहे. साधारण 22 जूनच्या सुमारास याची सुरुवात होते. दिवसाच्या प्रकाशात लक्षणीय फरक आहे; रात्र दिवसांपेक्षा मोठी आहे. सुरुवातीला, आपण पावसाळा अनुभवतो, त्यानंतर शरद ऋतू आणि हिवाळा येतो. दक्षिणायन नकारात्मकतेशी संबंधित आहे, म्हणूनच या भागात शुभ कार्ये किंवा विधी करण्याची शिफारस केलेली नाही.


उत्तरायणाची सुरुवात हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या उत्सवाने साजरी केली जाते जी वास्तविक उत्तरायण चळवळीच्या तारखेच्या अगदी जवळ येते. पुराण त्याच्या पावित्र्याला आणखी पूरक आहेत- गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर आली तो दिवस मानला जातो; भीष्म पितामहांनीही उत्तरायण येईपर्यंत वाट पाहिली आणि बलिदान दिले.


माघ स्नानाच्या विधीमध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची शिफारस केली जाते आणि उत्तरायण उत्सवातील एक प्रसंग आहे. याचे कारण म्हणजे उन्हाळा स्वच्छ आकाश आणि देवतांकडून ज्ञान आणतो; उत्तरायण हा त्यांचा दिवस. त्याचप्रमाणे दक्षिणायनचे ढगाळ आकाश रात्रीचे प्रतीक आहे. साधनेच्या दृष्टीने उत्तरायण हे ज्ञानप्राप्तीसाठी आणि दक्षिणायन हे शुद्धीकरणासाठी आहे.


या वर्षी उत्तरायण संपेल आणि दक्षिणायन शनिवार 16 जुलै 2022 रोजी सुरू होईल.

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

Chaturmaas

चातुर्मास[हिंदी]

Chaturmaas

चातुर्मास

चातुर्मास की शुरुआत आषाढ़ महीने के शुक्ल पक्ष की देवशयनी एकादशी से होती है, इस समय सूर्य कर्क राशि में प्रवेश करता है। और अंत कार्तिक मास के शुक्ल पक्ष की देवप्रबोधिनी एकादशी पर होता है, जब सूर्य तुला राशि में होता है।


माना जाता है की इस दौरान देवी-देवता निद्रावस्था में होते हैं, देवशयनी की संधि होती है देव + शयनी, यानि निद्रा; और अंत में वह जागृत अवस्था में लौटते हैं, देव + प्रबोधिनी = देवप्रबोधिनी यानि जागृति। चातुर्मास का काल विवाह जैसे समारोह के लिए अशुभ समझा जाता है, लेकिन तपस्या, व्रत एवं पवित्र स्नान के लिए उचित बताया गया है।


चातुर्मास, अर्थात ‘चार महीने’, सामान्यतः अंग्रेजी महीना जून-जुलाई के वर्षाकालीन ऋतु में शुरू होता है और अक्टूबर-नवंबर में समाप्त होता है। विभिन्न भाषाओं में इसे अलग- अलग नामों से जाना जाता है: तेलगु में तोलि, मराठी में आषाढ़ी एकादशी और उत्तरी प्रदेशों में महा एकादशी, देवपोली, पद्मा एकादशी, हरी-शयनी एकादशी भी नाम है।


प्रत्येक रीत की तरह चातुर्मास के पीछे भी तर्क है। मानसून में रोग बड़ी शीघ्रता से फैलते हैं, और उपवास एवं पवित्र संस्कार सेहत बनाये रखने में बहुत सहायता करते हैं। इस मौसम में पेट में गैस होना, पचानेकी शक्ति कम होने, और पेट की बीमारियोंजैसी तक्लीफोंसे दूर रहने के लिए चातुर्मास में प्याज और लहसुन खाना उचित नहीं मानाजाता हैं।


भलेही विवाह, उपनयन जैसी रसमें इस दौरान नहीं की जातीं लेकिन चातुर्मास त्योहारों से भरा है जो ईश्वर की महिमा का जश्न मनाते हैं जैसे गुरु पौर्णिमा, जन्माष्टमी, रक्षा बंधन, गणेश चतुर्थी, नवरात्री, दशेहरा और दिवाली।


आइये चातुर्मास से जुडी एक कथा पढ़ें। बली नामक एक असुरोंके राजा थे, जो भक्त प्रह्लाद के पोते थे। उनकी सत्ता त्रिलोक में फैली हुई थी। इस बात से भयभीत होकर इंद्रदेव भगवान विष्णु से रक्षा की प्रार्थना करने आ पहुँचे। भगवान विष्णु वामन अवतार धारण कर बली को मिलने गए, और केवल तीन क़दमों जितनी जमीन तोहफे के तौर पर मांगी। राजा हस पड़े, लेकिन यह दान देने केलिए मान गए।


लेकिन हुवा कुछ औरहि, चमत्कार से वामन का आकर विशाल होता गया, इतना बड़ा की पृथ्वी उसके एक कदम में समा गयी, और स्वर्गलोक दूसरे कदम में। दैत्यराज समझ गए की यह कोई और नहीं बल्कि भगवान विष्णु की लीला है, और अपनाही शीश उन्हें तीसरे कदम हेतु अर्पण किया। यह सच में महानता का प्रतीक है; मना करने के बजाय बली ने अपना वडा पूरा करने के लिए अपनी स्वयं को ही अर्पण कर दी। वामन ने उसका स्वीकार कर अपने तीसरे पग से बली को वापिस नर्क भेज दिया।


बली के भक्ति भाव से प्रभावित होकर भगवान विष्णु ने उसे एक वरदान मांगने की अनुमति दी, तो बली ने केवल एक इच्छा प्रकट की, कि भगवान विष्णु और देवी लक्ष्मी हर वर्ष का एक तिहाई समय उसके निवासस्थान में गुजारें। इस वजह से चार महीनो के लिए भगवान विष्णु और देवी लक्ष्मी बली के घर आराम करते हैं और उनके भक्त ध्यान व प्रायश्चित करते हैं।


इस वर्ष 2022 में चातुर्मास १० जुलाई (रविवार) को शुरू होकर ५ नवंबर (शनिवार) पर समाप्त होगा।

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

Chaturmaas

चातुर्मास[मराठी]

Chaturmaas

चातुर्मास

आषाढ महिना – 4 था चंद्र मास, जेव्हा सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा शुक्ल पक्षाच्या 11 व्या तिथीला येणारी देवशयनी एकादशी पासून, जेव्हा सूर्य तुळ राशीतून संक्रमण करतो, म्हणजेच देवप्रबोधिनी एकादशी पर्यंत जी कार्तिक महिना – चंद्र मासातील ८ व्या महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 11 व्या तिथीला म्हणतात. ह्या संपूर्ण काळाला भारतभर चातुर्मास म्हणून संबोधले जाते.


असे मानले जाते की चातुर्मासात देव झोपलेले असतात, म्हणून देवशयनी (शयनी = झोपी गेलेले) असे नाव पडले. ही संज्ञा भगवान विष्णूच्या योगनिद्रा रूपाशी संबंधित आहे. जेव्हा देव जागे होतात, तेव्हा हा कालावधी संपतो, म्हणून देवप्रबोधिनी (प्रबोध = जागरण) असे नाव आहे. चातुर्मास हा काळ विवाह आणि तत्सम इतर सोहळ्यांसाठी अशुभ मानला जातो आणि तपश्चर्या, उपवास, पवित्र नद्यांमध्ये स्नान इत्यादी धार्मिक कार्यांसाठी अतिशय शुभ मानला जातो.


चातुर्मासचा शाब्दिक अर्थ ‘चार महिने’ असा अनुवादित केला जातो आणि इंग्रजी कॅलेंडर नुसार जून – जुलैच्या आसपास पावसाळ्यात सुरू होतो आणि ऑक्टोबर – नोव्हेंबर पर्यंत संपतो. वेगवेगळ्या प्रदेशात याला अनेक नावांनी ओळखले जाते: तेलुगु मध्ये टोली, महाराष्ट्रात आषाढी एकादशी आणि उत्तरेत महा एकादशी. देवपोळी, पद्म एकादशी, हरि शयनी एकादशी ही काही दुर्मिळ नावे आहेत.


परंपरेप्रमाणे, याचे तार्किक स्पष्टीकरण आसे कि, पावसाळा आल्यावर रोगराईचा फैलाव झपाट्याने होतो. उपवास आणि पवित्र विधींचे पालन केल्याने आरोग्य वाढते, ह्या कालावधीत पोटात गॅसचा त्रास होणे, अपचन अश्या त्रासांपासून बचाव करण्यासाठी चातुर्मासात कांदा आणि लसूणाचा वापर खाण्यामध्ये टाळतात.


जरी विवाहा सारखे संस्कार वर्ज केलेले असले तरी चातुर्मास हा सणांनी भरलेला असतो आणि त्या काळात गुरु पौर्णिमा; कृष्ण जन्माष्टमी; रक्षाबंधन; गणेश चतुर्थी; नवरात्री, दसरा, दिवाळी सारखे सण साजरे होतात.


चातुर्मासाशी संबंधित एक कथा वाचूया. बळी राजा हा असुरांचा राजा आणि भक्त प्रल्हादचा नातू होता. त्रैलोक्यांवर त्याच्या वाढत्या सामर्थ्यामुळे घाबरलेल्या इंद्राने भगवान विष्णूला संरक्षणासाठी प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळी राजाला भेट दिली. त्याने राजाला 3 पावलांइतकी जमिन भेट मागितली. बळी राजाला वामनाच्या ह्या मागणीचे खूप हसू आले. तो ब्राह्मणाची इच्छा पूर्ण करण्यास तयार झाला.


परंतु झाले भलतेच, वामनाच आकार प्रचंड मोठा झाला आणि त्याने एका पावलात पृथ्वी झाकली आणि दुसऱ्या पावलात स्वर्गलोक. तो दुसरा कोणी नसून विष्णू असल्याचे बळीला समजले आणि स्वतःची चुकाही. वाचन पूर्ण करण्यासाठी त्याने वामनाला स्वतःचे मस्तक अर्पण केले. हेच खरे महानतेचे लक्षण होते. ब्राह्मणाला दूर करण्याऐवजी त्यांनी स्वतःचा त्याग केला. वामनने त्याचा प्रस्ताव स्वीकारला आणि त्याच्या पावलाने त्याला पुन्हा नरकामध्ये ढकलले.


त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्याला त्याची इच्छा पूर्ती करून घेण्याची संधी दिली. बळीने फक्त हात जोडून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला दर वर्षातील एक तृतीयांश काळ आपल्या निवासस्थानी राहायला येण्याची विनंती केली. म्हणून, चार महिन्यांचा कालावधी, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी बाळीच्या घरी विश्रांती घेतात आणि आपण ध्यान आणि प्रायश्चित्त विधी पाळतो.


यावर्षी चातुर्मास रविवारी 10 जुलै रोजी सुरू होईल आणि शनिवारी 5 नोव्हेंबर रोजी संपेल.

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

भागवान के समक्ष दीया क्यों जलाएँ?

Why we light a Diya in the evening

भागवान के समक्ष दीया क्यों जलाएँ?

पुराने जमाने मे बिजली के प्रसार से पूर्व शाम अँधेरे से भरी होती थी, और दीया प्रकाश का एकमेव साधन हुआ करता था। इसी लिये पूजाघर में दीया प्रज्वलित कर घर रोशन किया जाता था, और प्रार्थना कही जाती थी, जिससे सकारात्मक विचारों का प्रोत्साहन हो।


दीये की समानता विद्या के साथ कियी जाती हैं, उसे अंधकार और अज्ञान का मारक माना जाता हैं। तर्कवाद के नुसार, प्रकाश सकारात्मकता लाता है क्योंकि यह भय और संदेह दूर करता है जो अँधेरे से पैदा होते हैं। चैतन्य को हम जागरूकता या ईश्वर की अभिज्ञता कहते हैं, और दिए में यह विशेष गुण है, जो हमें हमारे वातावरण पर के हमारे ध्यान को बढ़ाता है।
यही ध्यान और चेतना विद्या प्राप्त करने में सहायता करते हैं, जिसके द्वारा हम अपने ध्येय हाँसिल कर सकते हैं।


तेल के दीये की जगह बल्ब या ट्यूब-लाइट क्यों नहीं जलाते?


सवाल तो काफी उचित है, आखिर अंत में उजाला करना और अंधकार ही तो मिटाना है! नहीं नहीं, दिए का महत्व केवल इतने पर सीमित नहीं; दीपज्वलन का आध्यात्मिक महत्व अलग होता है। दिए में भरा तेल (या घी) हमारी वासनाओं, या आवेग में की गयी इच्छाओं का प्रतीक है, व बाती हमारे अहंकार को दर्शाती है। जब आत्म की ज्वाला जलाई जाए तब वासनाएँ आहिस्ते-आहिस्ते निःशेष हो जाती है व अहंकार मिट जाता है।


अग्नि तत्त्व सूर्यदेव का प्रतीक है, जो जीवन और शक्ति के प्रसारक हैं। आपने देखा होगा की ज्योति हरदम ऊपर की दिशा में जलती है; यह मुश्किलों का डट कर सामना करने का पाठ पढ़ाती है, और उच्च आदर्शों का पालन कर ध्येय तक पहुँचने को कहती है। ज्योति आत्मविश्वास और आशा का प्रतीक है।


भगवान संग थोड़ा समय बिताइए और उनसे ख़ामोशी में मन कि सारी बातें कहें और दीये को ऊन लामहो का साक्षी होने दो।

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

देवासमोर दिवा का लावायचा

Why we light a Diya in the evening

देवासमोर दिवा का लावायचा

पूर्वीच्या काळी वीज नव्हती, त्यामुळे लोक संध्याकाळी घरातील देव्हाऱ्यासमोर दिवा लावत, ज्यामुळे घरात उजेड पसरे आणि अंधार नाहीसा होई आणि मग त्या अग्नीचा वापर बाकी कामांसाठी करत असत.

 

प्रकाशाचा संबंध ज्ञानाशी जोडतो आणि त्याला अंधार आणि अज्ञानाचा नाश करणारा म्हणून पाहतो. तार्किकदृष्ट्या, प्रकाश सकारात्मकता आणतो कारण तो अंधारामुळे येणारी भीती आणि अनिश्चितता कमी करते. चैतन्यची गुणवत्ता जागरूकता किंवा चेतना म्हणून स्पष्ट केली जाऊ शकते, हे ईश्वराच्या आध्यात्मिक रूप दर्शवते. दिव्याचे चैतन्य देखील असते, जे आपल्या सभोवतालच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करते.

 

प्रकाशाने जसा अंधार दूर होतो त्याच प्रमाणे ज्ञानाने अज्ञान दूर होते. ज्ञान ही एक चिरस्थायी आंतरिक संपत्ती आहे, ज्याद्वारे सर्व बाह्य सिद्धी साध्य करता येतात. म्हणून सर्व प्रकारच्या संपत्तीमध्ये श्रेष्ठ संपत्ती ज्ञान, म्हणून आपण दिवा लावून त्यापुढे नतमस्तक होतो.

 

तेलाच्या दिव्या ऐवजी बल्ब किंवा ट्यूबलाइट का लावू नये?

 

बरोबर आहे, तेही अंधार दूर करेल, पण पारंपारिक तेलाच्या दिव्याला आणखी आध्यात्मिक महत्त्व आहे. दिव्यातील तेल किंवा तूप हे आपल्या वासनांचे किंवा नकारात्मक प्रवृत्तींचे आणि आपल्या मनातील वात, अहंकार, अशुद्धता यांचे प्रतीक आहे. जेव्हा अध्यात्मिक ज्ञानाने प्रज्वलित होते, तेव्हा वासनेची भावना कमी होते आणि अहंकार देखील नष्ट होतो.

 

अग्नी तत्व सूर्याचे प्रतीक आहे, ज्याच्यामुळे विश्वाचे चक्र अविरत सुरूच आहे आणि ते जगाला ऊर्जा देते. चमकणारी ज्योती नेहमी वरच्या दिशेस जाते, हि ज्योत आत्मविश्वास आणि स्फूर्ती देते, आयुष्यातील अडचणींशी लढा देऊन मजबूत जीवन जगण्याची क्षमता दर्शवते. उच्च आदर्शांकडे घेऊन जाणारे ज्ञान आत्मसात करण्याची सूचना आपल्याला देते. प्रकाश आपल्या जीवनात मोठी आशा दाखवतो.

 

देवासोबत शांतपणे थोडा वेळ घालवा आणि त्या ज्योतीला त्याची साक्षीदार बानू द्या!

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

तेहतीस कोटि देव कोणते?

33 koti dev

तेहतीस कोटि देव कोणते?

खूप लोकांना आपण नेहमी बोलताना ऐकतो तेहतीस कोटि देवांना साकडं घातलं – तेहतीस कोटि देवांच्या साक्षीने -तेहतीस कोटि देव अवतरले तरी शक्य नाही – इत्यादी, इत्यादी … आपल्याला खरंच वाटतं कि ‘तेहतीस कोटि’ चा अर्थ ‘तेहतीस करोड’ असेल. बापरे येवढे देव आहेत आपले…!


आणि ह्यामुळे आधुनिक काळातील तरुण पिढीचा आणि पाश्चात्यांसाठी हा एक मोठा चेष्टेचा विषय झालाय. नाही ओ नाही, नीट वाचा परत. येथे कोटि शब्दाची वेलांटी, ‘टि’ पहिली आहे. तेहतीस आकडा बरोबर आहे पण कोटि शब्दाचा अर्थ वेगळा आहे. हा शब्द संस्कृत मधून आलाय, ‘कोटि’ या शब्दाचा अर्थ कोटी किंवा करोड नसून ‘प्रकार’ असा आहे. जेंव्हा देवाने विश्व् निर्मिती केली तेंव्हा ह्या निसर्गाचे, सृष्टीचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी ३३ प्रकारच्या देवांची निर्मिती केली आणि त्यांच्यावर सृष्टीचा कार्यभार सोपवला.


त्यांच्यात ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र आणि १ प्रजापती असे पाच स्तर आहेत. प्रत्येकाचा कार्यभाग (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटि (कॅटेगरी) दिलेली आहे.

 

अष्टवसू: वसु नावाचा अर्थ ‘तेजस्वी’ किंवा ‘संपत्ती देणारा’ असा होतो. 

 

अष्टवसु हे निसर्गाच्या पैलूंचे प्रतिनिधित्व करणारे आठ मूलभूत देव आहेत. ह्यांचा उल्लेख रामायणात कश्यप आणि अदितीची मुले म्हणून आणि महाभारतात मनू किंवा ब्रह्मा प्रजापतीची मुले म्हणून आढळतो. पुराणातील वेग वेगळ्या ग्रंथांमध्ये त्यांची नावांमध्ये भिन्नता आढळते, तरी प्रचलित असलेली नावे पुढील प्रमाणे.


आप (पाणी), धृव (स्थिर), सोम (चंद्र), धर (पृथ्वी), अनिल (वारा), अनल (अग्नी), प्रत्यूष (सूर्य) आणि प्रभास (आकाश).


११ रूद्र: विष्णू पुराणा नुसार रुद्र हे शिवाचे अवतार दर्शवतात. शिव जेंव्हा अर्धनारी रूपात होते तेंव्हाच्या त्यांच्या त्या उग्र रुपाला रुद्र नाव दिले आहे. त्यातील पुरुष रूपाचे ११ अवतारात विभाजन झाले आणि त्यांच्यापैकी काही पांढरे आणि सौम्य होते तर काही गडद आणि भयंकर होते. त्यांची नावे पुढील प्रमाणे.


मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.


जो अर्धा भाग स्त्रीचा होता त्याचे हि ११ अवतारात विभाजन झाले आणि त्यापासून रुद्राणी तयार झाल्या. धी, वृत्ती, उसाना, उरणा, नियुता, सरपीस, इला, अंबिका, ईरावती, सुधा आणि दिक्षा. (पण त्यांच्या समावेश ह्या ३३ कोटि देवतां मध्ये केलेला नाही) पुन्हा ह्या ११ रुद्राची नावे आणि त्यांच्या जनकांची नावे प्रत्येक ग्रंथात / पुराणात वेगवेगळी दिली गेली आहेत पण सगळीकडे ती ११ च आहेत.


१२ आदित्य: १२ आदित्यांचा उल्लेख ऋग्वेदात ६-८ च्या संख्येने आढळतो, ब्राह्मणांमध्ये ही संख्या 12 पर्यंत वाढते. महाभारत आणि पुराणात कश्यप ऋषींचा पिता म्हणून उल्लेख आहे. वर्षाच्या प्रत्येक महिन्यात वेगळा आदित्य चमकतो असे मानले जाते. १२ आदित्यची नावे पुढील प्रमाणे.


अंशुमन, आर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू (वामन अवतारात)
१ इंद्र: इंद्र हा स्वर्गाचा आणि सर्व देवांचा राजा आहे. तो आकाश, वीज, हवामान, मेघ-गर्जना, वादळ, पाऊस, नदीचे प्रवाह आणि युद्ध यांचा कारक आहे. बऱ्याच ग्रंथ / पुराणांमध्ये इंद्राला ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य ह्या सगळ्यांनाचे नेतृत्व दिल्याचे दिसते.


१ प्रजापती: निर्मितीचा आणि संरचनेचा अधिपती म्हणजेच प्रजापती. सृष्टीची रचना आणि निर्मितीचा भार प्रजापतीवर होता. प्रजापतीला विषवकर्मा, दक्ष अश्या अनेक नावांनी ओळखले जाते. हा ब्रह्माचा मानसपुत्र आहे. ऋग्वेदात प्रजापतीला आदित्यांमधील एक मानला आहे, आणि त्याला पौरात्याच प्रतीक समजले जाते.


हे सगळे मिळून एकंदर ८ + ११ + १२ + १ + १ = ३३ प्रकारचे म्हणजेच ३३ कोटि देव होतात.

 

आता कोणी परत ३३ कोटी देव म्हणलं तर त्यांना हे सगळं समजावून सांगा आणि आपल्या देव-देवतांचा, संस्कृतीचा मान
राखा

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.