अधिक मास

अधिक मास
साधारण दर 3 वर्षांनी आपण ऐकतो कि “अधिक मास” आला. हा शब्द माहित असण्याचे कारण म्हणजे ह्या महिन्यात लेकीला आणि जावयाला लक्ष्मी नारायणाचे रूप मानून जेवायला बोलवून त्यांचे कौतुक केले जाते. प्रत्येक ठिकाणच्या आपापल्या रूढी – परंपरा असतात. परंतु कधी ह्या अधिक मासा बद्दल जाणून घेतलंत का? अधिक मास का येतो? कधी येतो? चला आज त्या बद्दल थोडं बोलूयात.
अधिक मास म्हणजेच जास्तीचा महिना. हा दर वर्षी येत नाही. इंग्रजी कॅलेंडर मध्ये जसा दर ४ वर्षांनी फेब्रुवारीत एक दिवस वाढतो तास आपल्या पंचांगात दर ३२.५ महिन्यांनी एक अक्खा महिनाच वाढतो. या अतिरिक्त महिन्याला अधिक मास / माल मास / धोंड्याचा महिना / पुरुषोत्तम मास असेही म्हणतात.
सौर वर्ष 365 दिवसांचे असते आणि चांद्र वर्षात 354 दिवस असतात. सौर आणि चंद्र वर्षात 11 दिवसांचा फरक आहे, तो समतोल राखण्यासाठी दर 3 वर्षांनी चांद्र वर्षामध्ये एक महिना जोडला जातो.
अधिक मास सरासरी 32.5 महिन्यांनी येतो. याला पुढील महिन्याचे नाव दिले जाते. उदाहरणार्थ: जर श्रावणा महिन्याच्या आधी अधिक मास आला तर त्याला श्रावण महिन्याचेच नाव दिले जाईल आणि अधिक श्रावण मास सुरू होईल. या अधिक मासाच्या 30 दिवसांनंतर मूळ श्रावण मास सुरू होईल.
परंतु हे लक्षात ठेवा कि चांद्र वर्षातील मार्गशीर्ष, पौष आणि माघ महिन्यांत अधिक मास कधीच येत नाही. तसेच कार्तिक महिन्यातील अधिक मास अत्यंत दुर्मिळ असतो, तो 250 वर्षातून एकदाच येतो, शेवटचा तो 1963 मध्ये झाला होता.
हा अतिरिक्त महिना अशुभ मानला जातो. म्हणून या काळात कोणतेही शुभ कार्याची सुरवात किंवा शेवट करू नये. या 3 वर्षांच्या कालावधीत साठलेल्या कर्माचे परिणाम कमी करण्यासाठी भगवान विष्णूची प्रार्थना, जप, पूजा करण्याचा सल्ला दिला जातो.
काही जणांचा प्रश्न होता कि जर ह्या काळात मृत्यू सारखी घटना घडली तर पुढील विधी कसे करावेत?
शास्त्र असा सांगते कि, जर कुणाचा मृत्यू ह्या महिन्यात झाला तर पुढील दिवसांचे विधी त्याच महिन्यात करावेत. वर्ष श्रद्ध पुढील वर्षी त्याच महिन्यात करावे.
उदाहरणार्थ: जर एका व्यक्तीचा मृत्यू मागच्या वर्षी श्रावण महिन्यात झाला असेल तर, ह्या वर्षीचे वार्षिक श्राद्ध अधिक श्रावण मधेच करावे. तसेच जर अधिक श्रावण महिन्यात मृत्यू झालेला असल्यास पुढील वर्षी श्रावण महिन्यात वार्षिक श्राद्ध करावे.
आता श्रावण सारख्या महिन्यला अधिक मास जोडला गेला असेल तर व्रतवैकल्यांची सुरवात ह्या महिन्यात करू शकता जस की श्रावणी सोमवार. परंतु मंगळागौर मात्र अधिक मासात केली जात नाहीत. २०२३ मध्ये अधिक श्रावण सुरु झाल्यावर येत आहे त्यामुळे श्रावणातील २ मंगळवार झाल्यावर 5 मंगळवार (अधिक मासातील) विश्रांती आहे आणि मग पुन्हा २ मंगळागौर श्रावण महिन्यातल्या येत आहेत.
या वर्षी अधिक मास श्रावण महिन्याचा असून १८ जुलैला सुरु होईल आणि १६ ऑगस्टला अधिक मास संपेल.